Breaking News

राज्यातील मतदार याद्यांमधून ४० लाख नावे गायब मा.न्या.कोळसे-पाटील यांचा आऱोप

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा केंद्रातील भाजपला फायदा व्हावा यासाठी राज्यातील मतदार यांद्यामधील ४० लाख नावे गायब करण्यात आल्याचा आरोप जनता दलाचे औरंगाबादचे उमेदवार तथा माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील यांनी केला.

आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रे लँब टेक्नोशियन आणि “No voter left behind” अभियान चालविणारे सयद खालीद सैफुल्लाह यांनी केलेल्या सर्वकक्ष पाहणीत ही बाब उघडकीस आणली.
मतदार याद्यांमधील एका कुटुंबातील मतदारांचे प्रमाण ४.६ टक्के होते. मात्र आता हेच प्रमाण २.९ टक्केवर आले असून २८८ विधानसभा मतदारसंघातील ६९ मतदारसंघात प्रत्यक्ष नमुना पाहणी करण्यात आली असता एकच व्यक्ती असलेल्या कुटुंबाची संख्या ७ लाख ९० हजार असल्याचे आढळून आले आहे. या हिशोबाने ३३ लाख घरात एकच व्यक्ती कुटुंबात असण्याची शक्यता आहे. यानुसार एकच व्यक्ती असलेल्या कुटुंबाची संख्या तब्बल २० लाखांनी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.
देसातील ४ कोटी दलित आणि ३ कोटी मुस्लिम मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यात आली असून हे मतदार भाजपला कधीच मतदान करत नसल्यानेच त्यांची नावे गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सर्व घटनात्मक संस्था कमकुवत केल्या आहेत. वास्तविक पाहता निवडणूक आयोगावर कोणाचा अंकुश नाही. तरीही या गोष्टी घडतात यावरून यामागे कोण आहे हे वेगळे सांगायला नको अशी टीका त्यांनी केली.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *