Breaking News

आगामी निवडणूकांमध्ये अडचण होवू नये म्हणून जानकरांचा राजीनामा जानकर यांचा भाजपच्या आमदारकीचा राजीनामा पण उमेदवारीचा पेच कायम

नागपुर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांना एक वर्ष राहीलेले असताना भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडूण गेलेल्या पदुम मंत्री महादेव जानकर यांना आता स्वपक्षाची आठवण झाली आहे. मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष म्हणून वावरणारे महादेव जानकर हे विधान परिषदेत मात्र भाजपचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर भाजपच्या कोट्यातून मंत्रीही झाले. परंतु हाच मुद्दा येणाऱ्या निवडणूकामध्ये अडचणीचा ठरू शकतो या शक्यतेने विद्यमान आमदारकीचा राजीनामा देत जानकर यांनी स्वत:च्या पक्षाच्या नावावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ही निवडणुक १०० टक्के बिनविरोध होणार असे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या ११जागांसाठी होणार्या निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार सहज निवडुन येत आहेत. यात भाजपने मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली. तर पृथ्वीराज देशमुख यांनी सहावा उमेदवार म्हणुन अर्ज भरला आहे. दोन वर्षापुर्वी जानकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणुन निवडुन आले होते. त्यामुळे त्यांच्यावर रासपमधुन प्रचंड टीका झाली होती. ही चुक परत होऊ नये यासाठी जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासपाकडून उमेदवार अर्ज भरला आहे. परंतू, भाजपच्या आमदारकीचा राजिनामा न देता, रासपाचा अर्ज भरल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्षांची बंदी असती, त्यामुळे जानकर यांनी गुरुवारी सकाळी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यानंतर रासपाचा अर्ज भरला. आज विधानपरिषदेत सभापतींनी निवेदन करून जानकरांचा राजीनामा मान्य केला.

पत्रकारांशी बोलताना महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या केंद्रीय समितीने जानकरांना उमेदवार जाहीर केली होती, पण त्यांनी रासपकडुन उमेदवार भरली आहे. त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जानकर यांना रासपाकडून निवडुन लढवू द्यावी अशी मागणी केंद्रीय समितीकडे केली आहे. विधानपरिषदेची निवडणुक १०० टक्के बिनविरोध होईल. जरी जानकरांनी माघार घेतली तरी त्यांच्या मंत्रीपदाला सहा महिने धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *