Breaking News

अॅड प्रकाश आंबेडकरांची भीती, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘त्या’ प्रतिज्ञांवर येणार बंदी

काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या धम्मचक्र प्रवर्तक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला दिल्ली सरकारमधील आम आदमी पार्टीचे मंत्रीही हजर होते. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्म स्विकारताना २२ प्रतिज्ञांचे पालन करण्यासंबधी अट घालत त्याचे पठण करून घेतले होते, त्या प्रतिज्ञांचे पठण त्यावेळी करण्यात आले. त्यानंतर या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी अशा पध्दतीच्या प्रतिज्ञा घ्यायला लावून हिंदू धर्माविषयी चीड कऱण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला.

यापार्श्वभूमीवर वंचितचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांनी या प्रतिज्ञांवरून भीती व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ जारी केला असून गुजरात निवडणूकीनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या त्या २२ प्रतिज्ञांवर बंदी घालण्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, दिल्लीमध्ये मध्यंतरी धम्मदीक्षेचा सोहळा पार पडला. त्यामध्ये २२ प्रतिज्ञांचं पठण करण्यात आलं. या २२ प्रतिज्ञांवरून देशभरात वादळ माजतय अशी परिस्थिती आहे. वैदिक हिंदू संघटना व त्यांचे प्रतिनिधी यांनी २२ प्रतिज्ञांवर बंदी आणावी अशी भूमिका घेतली आहे. गुजरातच्या निवडणुका होईपर्यंत बंदी येणार नाही. परंतु गुजरातच्या निवडणुका संपल्या की बंदी येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली.

या दृष्टीने विचार करता भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने नांदेड येथे ५ नोव्हेंबरला धम्म अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. सर्व आंबेडकरवादी, आणि ज्यांनी ज्यांनी दीक्षा समारोह पार पाडलेला आहे त्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे. धम्म शक्ती हीच खरी शक्ती आहे. याच शक्तीच्या बळावर आपण २२ प्रतिज्ञांवर येणारी बंदी थांबवू शकतो. माझे आवाहन आहे की, आपण ५ तारखेला धम्म अधिवेशनाला उपस्थित रहा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *