Breaking News

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होवू देणार नाही धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली शेतकऱ्यांशी चर्चा

नाशिक: प्रतिनिधी

वैतरणा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना शासन कोणावरच अन्याय होवू देणार नाही. शासन सर्वांच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याची ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी धरणग्रस्तांना दिली. थेट वैतरणा धरणावर जाऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

धरणाच्या बांधकामासाठी जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या मात्र काहींचा उपयोग झाला नाही. आजही शेतकरी अशा जमिनी कसतात. त्या शेतकऱ्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. वैतरणा धरणग्रस्तांच्या विषयावर महसूल, अर्थ, विधी व न्याय विभागाच्या सचिवांसह लवकरच बैठक घेऊन काही दिवसात या विषयावर तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार जयंत जाधव आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *