Breaking News

उध्दव ठाकरे यांच्या भेटीला पंकज भुजबळ राजकिय उत्सुकता वाढीला

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह, स्वपक्षातील नेत्यांकडून केईएम हॉस्पीटलमध्ये रिघ लावली. मात्र छगन भुजबळ यांचे चिंरजीव आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बुधवारी दुपारी भेट घेतली.

तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. मात्र त्यांना जामीन मिळाला त्या दिवशी पवार यांनी पत्रकार परिषद असूनही त्यात प्रतिक्रिया देणे खुबीने टाळले. तसेच पक्षाचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांना अद्याप भेटण्यास गेले नाहीत. त्यामुळे सुटकेनंतरही राष्ट्रवादीत छगन भुजबळ यांच्या सुटकेमुळे फारसा उत्साह असल्याचे दिसून आले नाही.

त्यातच जामीनानंतर चवथ्या दिवशी पंकज भुजबळ हे उध्दव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याने भविष्यात भुजबळ शिवसेनेत तर जाणार नाहीत ना अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. त्यातच पंकज भुजबळ आणि ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत कोणतीही राजकिय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *