Breaking News

अजित पवार गटाच्या अचानक भेटीवर जयंत पाटील म्हणाले, मला सुप्रिया सुळेंचा फोन… सर्वविरोधी पक्षाच्या बैठकीत जयंत पाटील यांना फोन आल्याने पाटील, आव्हाड तातडीने वायबी चव्हाण सेंटर

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी आज राज्य सरकारने प्रथेप्रमाणे चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे. तर दुसऱ्याबाजूला विरोधी पक्षांनी राज्यातील विविध प्रश्नावर राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्यासाठी रणनीती ठरविण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील दालनात बैठक पार पडली. मात्र ऐन बैठकीत शारद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन आला. त्यामुळे विरोधकांची बैठक अर्धवट सोडून जयंत पाटील आणि मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी बैठक सोडून वाय.बी.चव्हाण सेंटरकडे निघाले.

दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यासह मंत्रिपदाचे शपथ घेतलेले ८ मंत्र्यांनी अचानक वाय.बी.चव्हाण सेंटर येथे पोहचले आणि शरद पवार यांचा आर्शिवाद घेतला. ही बैठक सुरु असतानाच जयंत पाटील आणि आव्हाड शरद पवार यांच्या कार्यालयात पोहचले.

याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता म्हणाले, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होतो. तिथे खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आला. पवारसाहेबांनी वाय. बी. चव्हाण सेंटरला बोलावलं आहे. त्यामुळं निघालो असल्याचं जयंत पाटील म्हणाले. मला काहीच माहिती नसून फोन आल्यानंतर तातडीनं निघालो आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, मला माहिती नाही मला आता फोन आल्यानंतर मी निघालो आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *