Breaking News

चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काय दादा कालपर्यंत पोरं-टोर बोलत होते आता तुम्हीही… मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहेत असे म्हणायचं का?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाले. त्यातील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आरोपाचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टीपण्णी करत म्हणाले की, काय दादा कालपर्यंत पोरटोरं (आदित्य ठाकरे) म्हणत होते. आता तुम्हीही आम्हाला घटनाबाह्य सरकार असल्याचे म्हणायला लागलात. मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात असे आम्ही बनायचं का? नाही तर तुम्हीच जाहीर करून टाका असा मिश्किल टोला लगावला.

त्यावर विरोधकांच्या बाजूने खाली बसलेल्या बाकावरून कोणीतरी म्हणाले, तो अजून लहान आहे. त्यामुळे तुम्ही लक्ष्य देवू नका. त्यावर मुख्यमत्री शिंदे यांनी मी लक्ष्य देतच नाही. पण तुम्हीही म्हणायला लागलात अशी आठवणही करून दिली.

मागील तीन दिवसापासून राज्यपालांच्या भाषणावर विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारच्यावतीने चर्चेचा प्रस्ताव मांडला. त्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे गटाचे आमदार, शिवसेना, भाजपाच्या सदस्यांसह जवळपास सर्वपक्षाच्या आमदारांनी आपली मते व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर मिश्किल टीपण्णी करत चांगलेच टीकास्त्र सोडले.

वर्षा बंगल्यावरील चहापानाच्या बिलाचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी चहात काय सोन्याचा अर्क असतो का असा खोचक सवाल केला होता. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तुम्ही आमच्या चहापानाचं काढलंत, जेव्हा तुम्ही सरकारमध्ये होतात त्यावेळी तर वर्षाची दार त्यावेळी बंद होती. ते ऑनलाईन होते. त्यावेळची बिले काढून बघा. नसेल तर मी तुम्हाला देतो असे सूचक वक्तव्य करत आता कोरोना गेला ना आता वर्षाची दारे उघडली आहेत. चहामध्ये सोन्याचा अर्क नसतो पण राज्यभरातून सोन्यासारखी माणसे भेटायला येतात त्यामुळे किमान त्यांना चहा तर पाजलाच पाहिजे नाही का असे सांगत ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असल्याची आठवण करून देत त्यावेळी ठाकरे सरकार असताना तर तुम्हाला माहितच आहे की, त्यावेळी तर वर्षावर जायचं असेल तर कोरोना निगेटीव्हची चाचणी लागायची असा खोचक टोलाही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता खोचक टोला लगावला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *