Breaking News

Tag Archives: pune by election

निवडणूक निकालावर अजित पवारांचा खोचक टोला, त्यांच्यातच जोम आहे? आमच्यात जोम नाही? सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आला नाही..

कसब्यात २८ वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला असून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या रुपाने भाजपानं जागा राखली आहे. या निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. चिंचवडमध्येही जगताप यांच्याविरोधातील दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचं सांगत विरोधकांनी तो भाजपाचा नैतिक पराभव असल्याचा दावा केला. यावरच आज पाथर्डीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या त्या विधानावर मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, ‘बेगानी शादी में अब्दुला..’ चा पलटवार पोट निव़डणूक निकालानंतर उध्दव ठाकरेंनी टीका करत आता कसबा बाहेर आलाय देशही बाहेर येईल टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

तुम्ही पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीत प्रचाराच्या निमित्ताने आम्हाला म्हणालात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारासाठी राज्याच्या इतिहासात रोड शो करण्याची घटना. पण तुम्हीही गल्लीबोळात फिरत होतात. तुमचे नेते शरद पवार हे ही छोट्या छोट्या मिटींगा घेत होते. ते ही गल्लीबोळातच फिरत होते ना असा खोचक टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार …

Read More »

चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काय दादा कालपर्यंत पोरं-टोर बोलत होते आता तुम्हीही… मग तुम्हीही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहेत असे म्हणायचं का?

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाले. त्यातील ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यापाठोपाठ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आरोपाचा धागा पकडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल टीपण्णी करत म्हणाले की, काय …

Read More »

निकालानंतर उध्दव ठाकरे यांचा टोला, एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर आला… भाजपची निती वापरा आणि फेका, शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला

पुणे शहरातील कसबा पेठ निवडणूकीत २८ वर्षानंतर भाजपाचा पराभव करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळविला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला खोचक शब्दात टोला लगावला. निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा बाहेर आला आता देशही बाहेर पडेल, …

Read More »

बाळासाहेब थोरातांचा टोला, जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करत इतिहास घडवला धंगेकरांच्या कसबा पेठेतील विजयानंतर काँग्रेस नेते थोरात यांचा भाजपाला टोला

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात …

Read More »

पोट निवडणूकः महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाला “कही खुशी कही गम” लक्ष्मण जगताप यांची जागा भाजपाला राखण्यात यश, तर २८ वर्षानंतर भाजपाकडून काँग्रेसने मतदारसंघ हिसकावून घेतला

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक जाहीर झाली. या दोन्ही जागां राखण्यासाठी भाजपा-शिंदे गटाकडून आणि महाविकास आघाडीने कंबर कसली. त्यामुळे २८ वर्षापासून भाजपाच्या ताब्यातील जागा काँग्रेस हिसकावून घेणार का? चिंचवडची जागा परत मिळविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला, तोंड लपवून पळणारा नाही….कृष्णेच्या का काठावर प्रायश्चित… लोकांमध्ये मिसळणारा कार्यकर्ता

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. भाजपा-शिंदे गटाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वाहन रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत बोलताना विरोधी …

Read More »

राज ठाकरेंचे पत्राद्वारे आवाहन, जो उमदेपणा भाजपाने दाखविला तोच महाविकास आघाडीने दाखवावा बिनविरोध पोटनिवडणूकीसाठी राज ठाकरेंचे विरोधकांना आवाहन, पण..

पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून आवाहन केलं आहे. मी अगदी सुरुवातीपासून या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी पत्राद्वारे केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभेच्या …

Read More »

पुणे जिल्ह्यातील पोट निवडणूकीवरून अजित पवार म्हणाले, बिनविरोध होण्याचे कारण काय? पंढरपूर, कोल्हापूर, नांदेड येथील निवडणूक बिनविरोध झाली नव्हती

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतही उतरण्याची तयारी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला आवाहन …

Read More »