Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, कोश्यारींनी…“कोल्हापूर का जोडा नही देखा” त्यांना दाखविण्याची गरज राज्यपालांच्या वक्तव्यावर उध्व ठाकरे यांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नसल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राज्यात राजकिय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत म्हणाले की, कोश्यारींनी महाराष्ट्रात “महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा”, असा सूचक इशारा देत आता त्यांना कोल्हापूरी जोडा दाखविण्याची वेळ आली असल्याचेही म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी तातडीने शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत घेत राज्यपालांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यपाल पद मानाचे. त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही. तर त्याची पत्रास का ठेवायची असा सवाल करत मी मुख्यमंत्री असतांना लॉकडाऊन काळात राज्यपालांनी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळ उघडण्याचा आग्रह केला. मागे सावित्रीबाई फुलें बाबत हिणकस वक्तव्य केले. आणि काल पुन्हा आपत्ती जनक वक्तव्य केले. राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे आहे. कोश्यारींनी महाराष्ट्रात “महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा” अस म्हणायची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वाहणा दाखवणे गरजेचे. त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवावे लागेल असा सूचक इशाराही यावेळी दिला.

काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात. राज्यपाल महोदयांनी नियुक्त सदस्य बाबत आपल्याला अनुभव. आज मात्र त्यांनी कहर केलाय. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत. मुंबई ही हक्काने मिळवली आहे कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारानी लिहिले आहे १०५ नव्हे तर २००-२५० लोकांनी बलिदान दिले आहे असेही त्यांनी सांगितले.

राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत म्हणून शपथ घेतांना जाती पाती एकत्र ठेवायची शपथ ही घेतात. मात्र राज्यपालांनी हिंदूं मध्ये फुट पाडत जाती पाती धर्मावरुन आग लावणे असे गंभीर प्रकार सुरु केले आहेत. सध्या नव्याने हिंदूत्वाचा कोड फुटलेल्यांनी आता त्यांना घरी पाठवायचे का तुरुंगात? की त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करायचे असा खोचक सवालही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला.

अमराठी लोक चिडलेली आहे. गुण्यागोविदानं नांदणारी लोक त्यांच्या फुट. गेली तीन वर्ष महाराष्ट्राचे मीठ खाल्ले त्याच्याशी नमक हरामी केली. राज्यपालांना तात्काळ परत पाठवावे लागेल अशी मागणी करत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण मी कधीच मान्य करणार नसल्याचे सांगत राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. आग लावू नये राज्यपाल पदाची शान घालवली असल्याची टीका करत हे त्यांच्या ओठातून आलयं का पोटातून आलय हा संशोधनाचा विषय असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

जसे एखाद्या राक्षसाचा जीव पोपटता असतो तसे दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत आहे हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केलय. त्यांना मुंबई हवीय कारण मुंबईतला पैसा त्यांना हवाय त्यासाठी त्यांची ही सगळी धडपड चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

येणाऱ्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा विधानाचा हेतू असल्याचा आरोप त्यांनी करत आमच्या सोबत अमराठी आहेत असेही त्यांनी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *