Breaking News

राज्यपाल कोश्यारी यांची मुक्ताफळे, …तर मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही मुंबईतील दाऊदबाग जंक्शन येथील चौकचा नामकरण सोहळ्यात राज्यपालांचे वक्तव्य

आपल्या वाचाळ वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेले राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. तसेच त्या गोष्टीमुळे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचे सांगत मुंबई आणि ठाणे येथील गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबईत पैसेच शिल्लक राहणार नाहीत असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईत केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

मुंबईतील अंधेरी येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाच्या नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले.या कार्यक्रमाला भाजपा पुरस्कृत आमदार रवि राणा, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा आमदार नितेश राणे, भाजपा समर्थक खासदार नवनीत कौर राणा आदी उपस्थित होते.

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी म्हणूनही मुंबईला कोणी विचारणार नाही असे ते म्हणाले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही असेही ते म्हणाले.

जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान, भगतसिंग कोश्यारी यांच्या भाषणाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच त्या व्हिडिओ पाहल्यानंतर अनेक नेटकऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवित आहेत. तर अनेक राजस्थानी, गुजराती लोकांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठविली आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *