Breaking News

राजकारण

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. परंतु राणे यांच्या वकीलांनी २७ जानेवारीपर्यंत आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली. त्यावर अखेर राज्य सरकारच्यावतीने २७ जानेवारीपर्यत अटक करणार नसल्याचे तोंडी आश्वासन न्यायालयाला दिल्याने राणे …

Read More »

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचे काम अद्याप सुरु झाले नाही. तसेच आयोगाला ४५० कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात साडेचार कोटी रूपये दिल्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी …

Read More »

पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले

मराठी ई-बातम्या टीम   ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पुर्णवेळ सचिव. आणि आयोगाचे संशोधक सोलापूरात आणि आयोग पुण्यात अशी खरपूस …

Read More »

गोव्यातील निवडणूक युतीबाबत शिवसेना प्रवक्ते राऊत यांनी दिले हे संकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील जागांबाबत उद्या अंतिम निर्णय

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी गोव्यातही भाजपाच्या विरोधात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गोव्यात राष्ट्रवादी एकला चलो रेच्या विचारात असल्याचे जाहीर केले होते. मात्र शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील बोलणी उद्या अंतिम टप्यात …

Read More »

शाळा सुरु होणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण विधान आणखी १०-१५ दिवस बंदच राहणार

मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यात वाढत असलेली कोरोना आणि ओमायक्रॉनच्या मागील काही दिवसांपासून वाढ होत होती. मात्र आता संख्येत घट येवू लागली असून मुंबईसह राज्यात रूग्णसंख्याही स्थिर होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून अद्याप तरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यासंदर्भात …

Read More »

महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण विना परवानगी बसविलेला छत्रपतींचा पुतळा आणि पोलिस पोलिस प्रशासनाने काढला

मराठी ई-बातम्या टीम काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यावरून पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण झाले आहे. येथील महापालिकाचे मुदत मागील महिन्याच्या डिसेंबर महिन्यात संपली आहे. मात्र या अद्याप निवडणूक आयोगाकडून आणि राज्य सरकारकडून येथे प्रशासक बसविण्याच्या कोणत्याही हालचाली नसल्याने आगामी महापालिका निवडणूकीच्या …

Read More »

सर्वसामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिंलेडर मोदींना परत करणार महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम अच्छे दिनचे स्वप्न दाखवणा-या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रंचड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला गॅसची सब्सिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी …

Read More »

अजित पवार म्हणाले, नव्या पिढीने तारत्मय बाळगायला हवे, टीकेला उत्तर आमचे नेते देतील फडणवीसांना टोला पण थेट बोलण्याचे टाळले

मराठी ई-बातम्या टीम गोवा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष असून शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याची खोचक टीका केल्यानंतर यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना याबाबत विचारले असता नव्या पिढीने बोलताना तारत्मय बाळगायला हवे असा शालूजोडा फडणवीस …

Read More »

नवाब मलिक म्हणाले, भोजन मात्र दिखावा था…जिंदगी झंड बा, फिर भी घमंड बा फोटो ट्विट करत साधला युपी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भोजपूरी अभिनेत्यावर निशाना

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजपाचे अनेक आमदार पक्षाला रामराम करून समाजवादी पार्टीत प्रवेश करत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दलित, मागासवर्गाच्या घरी पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यापार्श्वभूमीवर आज योगी आदित्यनाथ यांनी एका दलित कुटुंबाच्या घरी जेवण …

Read More »

भाजपाची पहिली यादी जाहीर, योगी आदित्यनाथ मथुरेतून नाहीतर “या” मतदारसंघातून उभे परंपरागत गोरखपूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार

मराठी ई-बातम्या टीम उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून भाजपामधील अनेक नेते आमदार पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षाची वाट धरत आहे. त्यातच मध्यंतरी एका श्रीकृष्ण भक्ताला स्वप्नात येवून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असे सांगितले त्यामुळे या भक्ताने थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि योगी आदित्यनाथ …

Read More »