Breaking News

शाळा सुरु होणार का? आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे महत्वपूर्ण विधान आणखी १०-१५ दिवस बंदच राहणार

मराठी ई-बातम्या टीम

मुंबईसह राज्यात वाढत असलेली कोरोना आणि ओमायक्रॉनच्या मागील काही दिवसांपासून वाढ होत होती. मात्र आता संख्येत घट येवू लागली असून मुंबईसह राज्यात रूग्णसंख्याही स्थिर होवू लागली आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा सुरु होणार की नाही याबाबत राज्य सरकारकडून अद्याप तरी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

जालन्यात आज ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शाळासंदर्भात माहिती दिली.

जरी राज्यात रूग्ण संख्या वाढत असली तरी रूग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. तसेच मुलांना धोका जरी असला तरी मुलांना या विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण कमी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पहिले १० ते १५ दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आता त्यानंतर राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहुन शाळांबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्यातील शाळा सुरु होण्यासंदर्भात साधारणत: १ फेब्रुवारीनंतर पुन्हा सुरु होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या मागील आठवड्यातील बैठकीत राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून एक प्रसिध्द पत्रक जारी केले होते. त्यामध्ये राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत एक-दोन दिवसाच्या संख्येत घट आल्याने बेसावध राहू नका असा इशारा दिला होता. तसेच कमी झालेली संख्या पुन्हा वाढूही शकते असा अंदाजही त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता.

त्यामुळे आणखी १५ दिवसाचा अंदाज पाहिल्यानंतर पुढील महिन्यात शाळा सुरु करण्यासंदर्भातचा निर्णय घेतला जावू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत असून नाही तरी महिनाभरात कोरोनाची लाट कितपत जाईल या अंदाजावरून १४ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील कॉलेज आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने निर्बंधही लागू करण्यात आले आहेत.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *