Breaking News

राजकारण

काश्मीर फाईल्स प्रकरणी फडणवीसांनी स्व.बाळासाहेबांवरून मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा बाळासाहेब आणि उध्दव ठाकरेंच्या भूमिकेत जमीन-आस्मानचा फरक

मागील काही दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर संपूर्ण देशात वाद निर्माण झालेला असतानाच या चित्रपटाला महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची मागणी भाजपाने केली. परंतु भाजपाच्या या मागणीच राज्य सरकारने नुकताच नकार दिला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कश्मीर …

Read More »

१३,०४३.५७ कोटींच्या बुडीत घोटाळयांच्या सीबीआय चौकशीला परवानगी का देत नाही ? आमदार ॲड आशिष शेलार यांचा सवाल

राष्ट्रीयकृत बँकांचे विविध कंपन्यांनी सुमारे १३,०४३.५७ कोटी रुपये बुडविले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने राज्य सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही परवानगी का देत नाही ? असा सवाल भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्याची तातडीने दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी …

Read More »

अजित पवारांची मोठी घोषणाः खाजगी विमा कंपन्यांना मोठे करायचे नाही राज्यावर आलेल्या संकटावर मात करुन राज्याला नेटाने पुढे नेण्याचे काम केले - अजित पवार

मागील वर्षभरात राज्यातील शेतकऱ्यांवर जवळपास दोन ते तीन वेळा अस्मानी संकट आले. मात्र या संकटात विमा उतरवूनही शेतकऱ्यांना फारसा परतावा मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकार आणि शेतकरी दोघे मिळून फक्त विमा कंपन्यांना मोठे करायचे काम सुरु आहे की काय अशी शंका येत आहे. मात्र आता विमा कंपन्यांना मोठे न करता …

Read More »

शिक्षण मंत्री गायकवाडांचा मोठा निर्णयः तर शाळेची मान्यता रद्द आणि केंद्रही काढून घेणार विधान परिषदेत केली घोषणा

मागील काही महिन्यापासून पेपर फुटीप्रकणावरून सर्वच परिक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर यास आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधान परिषदेत मोठी घोषणा केली असून एखादे शाळेत पेपर फुटीची घटना घडल्यास त्यासाठी शाळा व्यवस्थापनास जबाबदार धरून शाळेची मान्यताच रद्द करण्यात येणार आणि जर कॉपी प्रकरण आढळून आले तर त्या …

Read More »

अजित दादांचा विरोधकांना टोला तर आमदार, पीए आणि चालकांसाठी दिली खुषखबर येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका

इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लगावला. अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांचा काश्मीर फाईल्स चित्रपटावरून भाजपाला टोला केंद्रानेच करमुक्त करावा म्हणजे तो सबंध देशभरात निर्णय लागू होईल

काश्मीर मधील एकंदर परिस्थितीवर आधारीत काश्मीर फाईल्स हा चित्रपट नुकताच रिलीज झाला या चित्रपटाबाबत दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केल्याने या चित्रपटाला महाराष्ट्रातही करमुक्त करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत होती. तोच धागा पकडत मागील तीन दिवसापासून अर्थसंकल्पावरील चर्चेला आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना म्हणाले की, …

Read More »

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या आक्रमक म्हणाल्या, सोशल मिडीयाचा… दिर्घ काळानंतर लोकसभेत मांडली भूमिका

पाच राज्यातील झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्वाच्या मुद्यावर मोठा खल झालेला असला तरी पक्षाच्या धोरणात्मक बाजूवरही चर्चा झाली. त्याच चर्चेतील मुद्यांचा धागा पकडत दिर्घ काळानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की,  राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला …

Read More »

आशिष शेलार म्हणाले, असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून काय… पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सुनावले

भाजपा आणि शिवसेनेतील हाडवैर सर्वश्रुतच आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधील आपल्या पक्ष नेत्यांना तशी सूचना द्यावी अशी मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती घेवून त्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे स्पष्ट …

Read More »

राज्यपालांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पुन्हा माघारी पाठविला, दिले हे कारण विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक रखडली

मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …

Read More »

संसदेतच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांना सुप्रिया सुळेंनी सुनावले, आई-बाप काढायचे नाहीत काश्मीर प्रश्नावरील चर्चे दरम्यान झाली शाब्दीक खडाजंगी

पाच राज्यातील निवडणूकीनंतर पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून आज काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत आई-बाप काढायचे नाहीत असा सज्जड दमच भरला. लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील …

Read More »