Breaking News

राजकारण

नाना पटोले यांच्या टीकेवर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधक त्या चष्म्या… सगळं समोरच दिसतंय की

शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा …

Read More »

हिंदूत्वासाठी बाहेर पडलेल्या मंत्र्यांची खाते वाटपानंतर अवस्था “आगीतून उठून फुफाट्यात”? खाते वाटपावरून धुसफूस

हिंदूत्वाचे कारण पुढे करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात सेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या ४० आमदारांपैकी ९ जणांना नुकतेच मंत्री पदाची लॉटरी लागत खात्यांचे वाटप झाले. मात्र उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये असताना जी खाती होती. त्यापेक्षा कमी दर्जाची तर काही जणांना तीच खाती पुन्हा मिळाल्याने या हिंदूत्वादी …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, …दुरंग्यापासून सावध रहा काँग्रेस मुख्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरु, नेताजी सुभाषचंद्र बोस या महानायकांसह लाखो स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष व बलिदानाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला व तिरंगा डौलाने फडकला. परंतु या तिरंग्याला न माननारे काही लोक आहेत ते लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत …

Read More »

ध्वजारोहण करताना मुख्यमंत्री शिंदेंनी केले ‘हे’ आवाहन सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊ या

महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊ या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. मंत्रालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी राज्यातील जनतेला …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; वारसा जपावा लागणार, पंचतत्व पालन व्हावे परिवारवाद हा राजकारण आणि संस्थामधून हटावावा लागणार

देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाल मध्ये प्रवेश केला आहे. येथून पुढची २५ वर्षे भारताला विकसित राष्ट्र करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला येणाऱ्या काळात प्रत्येक …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आवडीच्या गृह बरोबरच राज्याच्या तिजोरीच्या चाव्याही भाजपाच्या हिश्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार, विधि व न्याय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल चाल दिवसानंतर १८ मंत्र्यांचे खातेवाटप आज जाहिर करण्यात आले. या खाते वाटपावर भाजपाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणती खाती येणार याबाबत अटकळ बांधण्यात येत होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्या आवडीचे खाते गृह आणि राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असलेले वित्त हे …

Read More »

खाते मिळताच सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय, आता हॅलो नाही तर वंदे मातरम म्हणायचं निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव म्हणून हे वर्ष साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधत राज्याचे नव्याने सांस्कृतिक कार्यमंत्री झालेले सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा निर्णय घेत आता आता राज्यातील सर्व शासकिय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी फोनवर बोलताना हॅलो असे बोलून सुरुवात करण्याऐवजी वंदे मातरम …

Read More »

वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन

शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड …

Read More »

खातेवाटपानंतर अमोल मिटकरी म्हणाले, शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसली महत्वाची खाती भाजपाकडे

विरोधकांच्या सततच्या टीकेमुळे अखेर शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर चार दिवस संपत आले तरी खातेवाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर खात्यांचे वाटप झाले. या खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. खाते वाटपानंतर ट्विट करत अमोल मिटकरी म्हणाले, भाजपाने …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतरांकडे ‘ही’ खाती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सहीनंतर जाहीर

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास १३ खाती ठेवण्यात आली आहेत. यापैकी मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही …

Read More »