Breaking News

वादग्रस्त असूनही मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मिळाली ‘ही’ खाती सत्तारांकडे कृषी तर राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन

शिंदें-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या ऐन तोंडावर बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलींची टीईटी परिक्षेच्या घोटाळ्यात मुलींची नावे पुढे आली. तर शपथविधी सोहळ्यानंतर संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळ समावेशानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाच्याच महिला नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंपद मिळणार का? किंवा संजय राठोड मंत्रिमंडळात कायम राहणार का? या अनुषंगाने राज्यात उत्सकुता लागू राहिली होती. मात्र आज अखेर मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या दोघांनाही चांगली खाते मिळाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात अनेक महत्त्वाची खाती ही भाजपाला मिळाल्याचे दिसत असून भाजपाकडे महसूल, गृह विभाग, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर शिंदे गटाकडे पाणीपुरवठा व स्वच्छता, बंदरे व खनिकर्म, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग अशी खाती आली आहेत. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले मंत्री संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन हे खाते देण्यात आले आहे. तर टीईटी घोटाळ्यामध्ये मुलींची नावे आलेल्या अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या दोन्ही नेत्यांवरील आरोपानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, आज शिंदे सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाले असून अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी खाते सोपवण्यात आले आहे. तर संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेही संजय राठोड यांना देण्यात आलेले अन्न व औषध प्रशासन हे राज्याच्यादृष्टीने महत्वाची खाते असले तरी ते खाते फारच संवेदनशील म्हणून ओळखले जाते. या खात्याच्या अंतर्गत अनेक मेडिकल कंपन्यांची उत्पादन, सौदर्य प्रसाधने, तयार खाद्य पदार्थांमध्ये वापरण्यात येणारी साधने याशिवाय प्रत्येक खाद्यान्न आणि औषधांची तपासणी करण्याचे अधिकार या विभागाला आहेत. मात्र या खात्यामध्ये चालणाऱ्या सावळ्या गोंधळाबाबत फारशी चर्चा आतापर्यत झालेली नाही.

तर दुसऱ्याबाजूला अब्दुल सत्तार यांना मिळालेले कृषी हे खाते शेतकऱ्यांशी निगडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पेरणीसाठी बि-बियाणे, खते मिळतात की यापासून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यत पोहोचतात की नाही या गोष्टी पहाव्या लागणार आहेत. त्यामुळे या खात्याच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संपर्क आणि राज्यातील ग्रामीण भागाशी संपर्क करण्यास शिंदे गटाला एकप्रकारे मदत मिळणार आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *