Breaking News

राजकारण

रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर पलटवार करत ठाकरेंना म्हणाले, १९ मार्चला उत्तर देणार भास्कर जाधव हा चिपळूनचा लांडगा

नुकतीच खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला …

Read More »

कसबा पेठ निकालावर शरद पवार म्हणाले, रविंद्र धंगेकरांना विश्वास होता, पण मला खात्री नव्हती… खासदार गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे भाजपासह सर्वपक्षियांशी मैत्रीपूर्ण संबध

कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार उमेदवार उभे केले. या दोन्ही ठिकाणी भाजपाकडून चांगलीच ताकद लावण्यात आली. तर महाविकास आघाडीनेही पूर्ण ताकद लावली. या दोन्ही निकालांवरून सर्वच पक्षांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. तर कसबा पेठ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शरद पवार यांच्या मोदीबागेतील …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, बीबीसी हे केवळ उदाहरण..पण सत्ताधारी वसाहतवादी मानसिकतेचे… २०२४ ची निवडणूक बेरोजगारी, मुठभर धनिकांच्या हातात एकवटलेली संपत्ती, लघु-कुटीर उद्योगांचा झालेला नाश यासारख्या मुद्द्यावर लढली जाणार

बीबीसी डॉक्युमेंट्रीचा वाद आणि त्यावर प्रतिक्रिया देत असताना सत्ताधाऱ्यांकडून वसाहतवादी मानसिकतेचा आरोप करण्यात आला, यावर प्रश्न विचारला असता राहुल गांधी म्हणाले, हे प्रकरण अदाणी यांच्यासारखेच आहे. ते देखील वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण होते. ज्या ज्या ठिकाणी विरोध होतो, तिथे तिथे त्यांच्याकडून कारणे देण्यात येतात. खरेतर देशभरात विरोधातला आवाज दडपण्याचा प्रयत्न होत …

Read More »

जलील यांच्या आंदोलनावर संजय शिरसाटांची मागणी, औरंगजेबाची ती कबरच हटवा… एमआयएमचे आंदोलन म्हणजे बिर्याणी पार्टी असल्याचा आरोप

नुकतेच केंद्र सरकारने औरंगाबादच्या नामांतरास छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची काहीही हरकत नसल्याचे पत्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठविले. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून या संदर्भात अधिसूचना काढून नामांतराची प्रक्रिया सुरु केली. या नामांतराच्या निषेधार्थ ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तसेच औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे जाहिर …

Read More »

उध्दव ठाकरेंचा पलटवार, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण तुम्ही दिल्लीसमोर… चोर वृत्तीला मतदान करून नका

भाजपा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून कोरोना काळात उध्दव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते अशी जहरी टीका सातत्याने करण्यात येत आहे. या टीकेला खेड मधील सभेत प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि …

Read More »

उध्दव ठाकरेंची टीका, देशद्रोही बोलाल तर जीभ हासडून देईन, मग संगमांचं काय… खेडमधील जाहिर सभेत शिंदे गटाबरोबर भाजपावर साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभेनिमित्त आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही विधानावरून चांगलाच दम …

Read More »

महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावर शरद पवारांची स्पष्टोक्ती, निवडणूकीला सामोरे जाताना…. मी चर्चेत नसतो त्यामुळे मला माहित नाही

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने कसबा मतदारसंघातील मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला. तर चिंचवडमधील मविआच्या उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीच विचारलं नसल्याचे थेट भाष्य करत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहिर केला. त्यानंतर वंचितने …

Read More »

भास्कर जाधवांची खोचक टीका, रोज सगळ्या गावात फिरतात अन सांगतात…. झपाटलेल्या चित्रपटातल्या तात्या विंचू सारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची आज पहिल्यांदाच कोकणात आले होते. यावेळी खेड येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर खरमरीत समाचार घेतला. यावेळी केलेल्या भाषणात भास्कर जाधव …

Read More »

माजी मंत्री पाटील-चाकूरकर यांच्या चुलतभावाने का केली गोळी झाडून आत्महत्याः वाचा नेमके कारण आत्महत्येपूर्वी सर्वांना व्हॉट्सअपवरून गुड बायचा मेसेज

देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातूर हा येथील “देवघर” या निवासस्थानी हनमंतराव पाटील (वय ८५) यांनी रविवारी सकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. हनमंतराव पाटील हे शिवराज पाटील चाकूरकर यांचे सख्खे चुलत बंधू असून ते मूळचे चाकुर येथील रहिवासी होते. त्यांनी पुतणे तथा शिवराज पाटील यांचे चिरंजीव शैलेश …

Read More »

पोटनिवडणूकीच्या निकालावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुळात हा निकाल… पिंपरी चिंचवडमध्ये जनमत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात

नुकत्याच झालेल्या पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूकीत कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे विजयी झाले. तर चिंचवडमध्ये वंचितने मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिल्याने मविआचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात …

Read More »