Breaking News

राजकारण

काँग्रेसची भीती, अदानीची महागडी वीज राज्यातील वीजग्राहकांचे कंबरडे मोडणार अदानी पॉवरकडून सध्याच्या वीजखरेदी दरापेक्षा दुप्पट दरवाढीचा प्रस्ताव

महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना आता वीज दरवाढीच्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. अदानी पॉवरने वीजदरात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणला सादर केला आहे. ही दरवाढ मान्य केल्यास राज्यातील वीज ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक बसणार आहे त्यामुळे भाजपा सरकारने या दरवाढीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी प्रदेश काँग्रेस …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला शिंदे – फडणवीस सरकारने कात्री… कामांना स्थगिती देण्याचे उद्योग केल्याचा केला निषेध

विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत असून याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या …

Read More »

महाजनांच्या टीकेवर इम्तियाज जलील यांचा टोला, उच्च शिक्षित आहेत थोडी अक्कल असेल पण… छ्त्रपती संभाजीनगर किराडपुरा भागातील राड्यावरील आरोपाला प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री राडा झाला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं जाळली, सामान्य नागरिकांची वाहनं जाळली, अनेक वाहनांची तोडफोडही केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यामुळे कालपासून किराडपुरात तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराला खासदार इम्तियाज जलील कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन …

Read More »

सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया, शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात…. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो, ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, रामाचे नाव घेत सध्या दगड पाण्यावर तरंगतायत… धनुष्यबाण गेला तरी राम माझ्यासोबत

त्या काळी श्रीलंकेतील रावणाला हरविण्यासाठी रामसेतू बांधताना रामाच्या नावाने समुद्राच्या पाण्यात दगड टाकले जायचे आणि तरंगायचे असा रामनवमीचा संदर्भ देत आज रामाचे नाव घेत जे काही दगड तरंगताना दिसत आहेत ते केवळ दगड आहेत असा खोचक टोला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपाला लगावत पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन, रामनमवीचा कार्यक्रम पार पाडावा तणाव निर्माण होईल असे वक्तव्य कोणी करू नका

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरममध्ये दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही पाह्यला मिळाले. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या राड्याप्रकरणी शिंदे गटाबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर आरोप केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री …

Read More »

चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांना टोला, त्यांना जनता सांभाळता येत नाही फक्त… महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विग्न आणण्याचा प्रयत्न

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. तसेच अनेक वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री …

Read More »

छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी पोलिस आयुक्तांनी दिली ‘ही’ माहिती दोन गटातील किरकोळ भांडण

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. दरम्यान, येथील परिस्थिती आता नियंत्रणात असून काल रात्री नेमकं काय घडलं, याबाबत संभाजीनगरचे पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी माहिती दिली. रात्री झालेल्या राड्यानंतर …

Read More »

नाना पटोले यांचा टीका,…शिंदे-फडणवीस सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक वाद वाढत आहेत पण शिंदे-फडणवीस सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तर महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे, ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त …

Read More »

त्या टीपण्णीनंतर संजय राऊत यांची टीका, या सरकारची पत काय? बिनकामाचं आणि नपुसंक सरकार मी नाही तर आता न्यायालय आणि जनताही म्हणतेय

मागील काही दिवसात राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत एका विशिष्ट जनसमुदायाच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर घेण्यात आलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार हे नपुंसकासारख वागतंय, वेळेवर पाऊले उचलत नसल्याची टीपण्णी केली. या टीपण्णीवरून ठाकरे गटाचे खासदार …

Read More »