Breaking News

चंद्रकांत खैरे यांचा फडणवीसांना टोला, त्यांना जनता सांभाळता येत नाही फक्त… महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विग्न आणण्याचा प्रयत्न

काल रात्री उशीरा छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात मोठा राडा झाला. यामध्ये समाजकंटकांनी पोलिसांची आणि नागरिकांची वाहने जाळली. तसेच अनेक वाहनांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्याच्या घटनाही शहरातील किराडपुरा भागात घडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. याप्रकरणावरून ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत चांगलाच निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून, अशांतता करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे. मी मंत्री असताना पाच वर्षात एकही दंगल झाली नाही. पण, सध्याच्या गृहमंत्र्यांचं लक्ष नाही. गृहमंत्री आणि मिंधे सरकारचं हे अपयश आहे. हे फक्त त्यांचे खोकेवाले लोक सांभाळतात, यांना जनता सांभाळता येत नाही असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, २ एप्रिलला महाविकास आघाडीचा मेळावा आहे. त्यात विघ्न आणण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. एमआयएमला उचकवून देण्याचं काम करण्यात येत आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, असं सर्व लोक म्हणत आहेत. महापालिका, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हे सर्व सुरू आहे. याचा मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस आहेत. तर, भागवत कराड आणि जलील हे मित्र आहेत. त्यांचं हे प्लॅनिंग सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही केला.

यावेळी चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीच्या सभेवर कोणताही परिणाम होणार नाही. मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. पण, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, त्यांना मारलं आहे. पोलिसांवर आवाज करून बोललं, तरी ३५३ चा गुन्हा दाखल करतात. मग, दंगल करणाऱ्या लोकांवर का गुन्हा दाखल करत नाही. आज संध्याकाळपर्यंत आरोपींना पकडण्यात यावं. अन्यथा शातंताप्रिय ठेवलेलं संभाजीनगर परत उद्ध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही, असा इशाराही दिला.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *