Breaking News

राजकारण

मुख्यमंत्री शिंदे यांचा हल्लाबोल, वारसा सांगणारेच अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले सावरकरांचा अपमान कधीही सहन करणार नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले असून या राजकिय रणनीतीचा भाग म्हणून महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजी नगर येथे पहिलीच व्रजमुठ सभेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट) हे पक्ष राहुल गांधी …

Read More »

उत्तराखंड मधील त्या महिलेनंतर दिल्लीतील या महिलेने केले राहुल गांधी यांच्या नावे घर केंद्र सरकारच्या कारवाईनंतर जनसामान्यांकडून मिळतोय का प्रतिसाद

साधारणतः एका वर्षापूर्वी उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील एका महिलेने आपली जवळपास पन्नास लाख रूपयांची घरासह संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी सदर महिलेने आपली सगळी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केल्याची कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर आता मोदींच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने …

Read More »

संजय शिरसाटांचा उध्दव ठाकरे यांना सवाल, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगा तुम्ही…. शंकरराव गडाख आणि इतरांना मंत्रीपद देताना तुम्ही खोके घेतले का ?

राज्यात स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने टीकेची झोड उठविण्यात येत आहे. मात्र आज छत्रपती संभाजी नगर येथे पहिल्यांदाच महाविकास आघाडीची पहिलीच वज्रमुठ सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे नेते संजय शिरसाट यांनी थेट ठाकरे …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांनी सावरकरांचा विचार पुढे नेला, संघाला तर काहीच … राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या स्वा.सावरकर यांच्या विषयीच्या विधानवरून राज्यात ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून थेट सावरकर गौरव यात्रेचे आयोजन राजकिय कुरघोडीचा प्रयत्न सुरु केला. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिंदे गटाच्या सावरकर भूमिकेची पोलखोल करत करत राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला. संजय राऊत …

Read More »

तळीरामांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी महसूल यंदाच्या वर्षी २१ हजार कोटींचा महसूल मिळाला

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७,५०० कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन २०२२-२३ या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने २१,५०० कोटी रुपये …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, सावरकर राष्ट्रीय प्रश्न नाही….पण आताची परिस्थिती चिंता वाटणारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर शरद पवार यांचे मोठे विधान

छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. यामध्ये तरुणांनी दगडफेक करत पोलिसांसह खाजगी वाहनांची जाळपोळ केली. त्यानंतर गुरूवारी रात्री मुंबईतील मालवणी येथे रामनवमीच्या शोभायात्रे दरम्यान दोन गटात हाणामारी झाली. या दोन्ही घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच उद्या रविवारी औरंगाबादेत महाविकास आघाडीची पहिलीच सभा होत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदारांना… काँग्रेसच्या SC,ST,OBC, आदिवासी व अल्पसंख्यांक विभागाचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

देशात व राज्यात हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सभांना परवानगी देताना जाचक अटी घालून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपा केवळ जातींमध्ये व धर्मांमध्ये फुट पाडून राजकीय पोळी भाजत आहे. मनुवादी व्यवस्थेने अन्नदात्याला, गरिब माणसाला, छोटे दुकानदार यांना बरबाद करण्याचे काम केले. हेच लोक देशातील लोकशाही व …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे खोचक प्रत्युत्तर, मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण पण, मला मुख्यमंत्री शिंदेंनी… पण संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणाची चौकशी होणार

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज चर्चिण्यात येत आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. …

Read More »

याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? सुप्रिया सुळे यांचा सवाल संजय राऊत यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक, दरारा नाही काय ? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका …

Read More »

संजय राऊत यांचा हल्लाबोल, सगळी सुरक्षा गद्दारांच्या…. आम्ही बोललो तर भूकंप होईल विरोधकांना मिळत असलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही

संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या मोबाईल फोनवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्यांनी धमकीप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली. लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने ही धमकी देण्यात येत असल्याचं मोबईलवर आलेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, दिल्लीत एके ४७ रायफलने गोळ्या घालण्याची धमकी मेसेजमध्ये देण्यात आली आहे. …

Read More »