Breaking News

उत्तराखंड मधील त्या महिलेनंतर दिल्लीतील या महिलेने केले राहुल गांधी यांच्या नावे घर केंद्र सरकारच्या कारवाईनंतर जनसामान्यांकडून मिळतोय का प्रतिसाद

साधारणतः एका वर्षापूर्वी उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथील एका महिलेने आपली जवळपास पन्नास लाख रूपयांची घरासह संपत्ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावे केल्याची माहिती पुढे आली होती. त्यावेळी सदर महिलेने आपली सगळी संपत्ती राहुल गांधी यांच्या नावे केल्याची कागदपत्रेही सादर केली होती. त्यानंतर आता मोदींच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करत खासदार म्हणून दिलेले घरही रिक्त करण्याची नोटीस बजावली आहे. त्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांचा वेळ दिलेला आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने माझं घर…तुमचं घर ही मोहीम हाती घेतली असून ही मोहीम सुरु केली असतानाच दिल्लीतील एका महिलेने आपलं चार मजली घर चक्क राहुल गांधी यांच्या नावे केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नव्या महिलेची जोरदार चर्चा सुरु आहे.

राजकुमारी गुप्ता असं या महिलेचं नाव आहे. ती दिल्लीतील मंगोलपुरी येथे राहते. येथील राहतं घर तिने राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे. राजकुमारी गुप्ता यांचं मंगोलपुरीत चार मजली अलिशान घर आहे. या महिलेने राहुल गांधी यांच्या नावावर घर खरेदी केल्याचे कागदपत्रंही शेअर केले आहेत. त्यावर या महिलेचा आणि राहुल गांधी यांचा फोटो दिसत आहे. तसेच कागदपत्रावर नोटरीचा शिक्काही दिसत आहे. त्यामुळे ही महिला चर्चेत आली आहे.

काँग्रेस नेते आणि काँग्रेसच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मेरा घर, आपका घर कँम्पेन सुरू केलं आहे. त्यानुसार राहुल गांधी यांचे समर्थक सोशल मीडियावर आपल्या घराचा फोटो टाकत आहेत आणि त्यावर माझ घर… तुमचं घर… असा मजकूर लिहीत आहेत. काँग्रेसच्या या मोहिमेला सोशल मीडियात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या महिलेने केवळ सोशल मीडियावर घराचा फोटो न टाकता खरोखरच आपलं घर राहुल गांधी यांच्या नावावर केलं आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर दोन दिवसांनी संसदेच्या आवास समितीने राहुल गांधी यांना नोटीस पाठवून बंगला खाली करण्याचे निर्देश दिले होते. तसेच २२ एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्याचे आदेश राहुल गांधी यांना देण्यात आले. राहुल गांधी हे दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील १२, तुघलक रोडवरील सरकारी बंगल्यात राहतात. २००५ पासून त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे.

एप्रिल २०२२ रोजी डेहराडून येथील महिलेने राहुल गांधी यांना दिली त्याचा जूना फोटो…

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *