Breaking News

संजय राऊत यांचा हल्लाबोल, बाळासाहेबांनी सावरकरांचा विचार पुढे नेला, संघाला तर काहीच … राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या माध्यमातून भाजपावर निशाणा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या स्वा.सावरकर यांच्या विषयीच्या विधानवरून राज्यात ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि शिंदे गटाकडून थेट सावरकर गौरव यात्रेचे आयोजन राजकिय कुरघोडीचा प्रयत्न सुरु केला. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिंदे गटाच्या सावरकर भूमिकेची पोलखोल करत करत राष्ट्रीय स्वंयसेवक संघावरही निशाणा साधला. संजय राऊत हे आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, स्वा.सावरकर हे पुरोगामी आणि विज्ञाननिष्ठ होते आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला त्यांच्या विचारांशी काहीच देणे घेणे नाही असे सांगत सावरकरांचे विचार खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेले. जसे सावरकरांना शेंडी जानव्याचे हिंदूत्व मान्य नव्हते तसे बाळासाहेब ठाकरे यांनाही मान्य नव्हते असे सांगत संघ सावकरांचे हिंदूत्व मानत नसल्याचा दावाही केला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हमाले, सावरकर आणि संघाचे विचार भिन्न आहेत. दोघांचे विचार वेगवेगळे आहेत. संघ आणि सावरकरांच्या विचारात मेळ नाही. संघ सावरकरांचे हिंदुत्व मानत नाही. मग सावरकरांचे विचार कसे नेणार? बाळासाहेबांनीच सावरकरांचे विचार पुढे नेले, असं सांगतानाच सावरकर यात्रा ही राजकीय अजेंड्यासाठीच काढली जात आहे. संभाजीनगरमधील दंगल हा राजकीय अजेंडाच होता, असा आरोपही केला.

सावरकरांच्या हिंदूत्वावर बोलताना संजय राऊत म्हमाले, सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार देताना पुरोगामी आणि विज्ञानवाद स्वीकारला. भाजपा म्हणते, गाय ही गोमाता आहे. तर सावरकरांना ते मान्य नाही. गाय ही उपयुक्त पशू आहे. जर गाय दूध देण्याची थांबली तर गायीचं गोमांस खायला हरकत नाही, हा सावरकरांचा विचार होता. हा विचार भाजपाला मान्य आहे का?, असा थेट सवालही केला.

आज संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची सभा होत आहे. महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. आजच्या सभेला उद्धव ठाकरे पोहोचतील. संभाजीनगरातील महत्त्वाचे नेते असतील. मराठवाड्यातील शिवसेनेचे महत्त्वाचे नेतेही सभेला येतील. ही महाविकास आघाडीची सभा आहे. उगाच व्यासपीठावर गर्दी नको. लोकं प्रमुख लोकांची भाषणे ऐकायला येणार आहे. आजच्या सभेला प्रचंड गर्दी होईल अशी शक्यता आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही कामानिमित्त नवी दिल्लीला संजय राऊत हे जाणार असल्याने ते छत्रपती संभाजीनगर येथील सभेला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *