Breaking News

फडणवीसांनी सत्तारांना क्लिन चीट देत केली टीईटी घोटाळ्याची चौकशी जाहिर विधानसभेत भाजपा आमदार संजय कुटे यांच्या मागणीवर फडणवीसांचा निर्णय

विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिलेला टीईटी घोटाळ्यावर चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती नाकारल्यावर विरोधी बाकावरील सदस्यांनी सभात्याग केला. मात्र याच मुद्यावरून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संजय कुटे यांना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुरेसा वेळ दिला.

त्यानंतर संजय कुटे यांनी उपस्थित केलेल्या टीईटी परिक्षा घोटाळ्याच्या मुद्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्वतःच्या सत्ता काळातील घोटाळे बाहेर काढणारा हा पहिलाच विरोधी पक्ष आहे असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

तसेच मागील काही दिवसांपासून टीईटी परिक्षेतील घोटाळ्याच्या माध्यमातून राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या दोन्ही मुलांना नोकरीवर लावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. तसेच यासंदर्भातील काही कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. तरीही देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या एकाही मुलीला नोकरी मिळालेली नसल्याचे सांगत टीईटी घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांना क्लिन चीट दिली.

शिक्षक पात्रता भरती घोटाळ्यात मंत्रालय पातळीवर झालेल्या घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

पात्रता परीक्षा घेणाऱ्या कंपन्या पात्र नसतानाही त्यांना पात्र करण्याचे काम मंत्रालय पातळीवर कोणी केलं याची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं.

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा अपात्र कंपन्यांना पात्र केल्याने झाला आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांचा टीईटी घोटाळ्याप्रकरणी दिलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. नेमक्या याच संधीचा फायदा घेत लोकायुक्त कायदा एकमताने मंजूर केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *