Breaking News

अजित पवार म्हणाले, या विषयावर मी राज ठाकरेंशी बोलेन

मी ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या काही क्लीप पाहिल्या आहेत. चित्रपट पाहिला नाही. परंतु लहानपणापासून ऐकत आलो… धिप्पाड अफजलखान इतिहासात दाखवला जात होता. वाघनखे वापरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजखानाला मारले त्याचा कोथळा बाहेर काढला. परंतु या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला उचलून मांडीवर घेऊन (नरसिंहासारखा) कोथळा बाहेर काढताना दाखवले आहे. अरे काय दाखवताय… का मोडतोड करताय इतिहासाची… सेन्सॉर सरकार नेमते.. सरकार हस्तक्षेप करू शकते. जे काही इतिहासात घडले त्याला तोडफोड करून दाखवू नका… छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विऱोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

याप्रश्नी राज ठाकरे यांची भेट घेणार का असा प्रश्न केला असता आज उशिरा राज ठाकरे यांच्याशी बोलेन व या चित्रपटाबाबत हस्तक्षेप करायला सांगेन असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
‘हर हर महादेव’ हा चित्रपट तज्ज्ञ लोकांना घेऊन बघेन आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन माहिती देईन. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *