Breaking News

अजित पवारांच्या मागणीवर फडणवीस म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री शाहंना पत्राद्वारे कळविणार मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही

विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत कर्नाटक सरकारच्या विरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतरही कर्नाटकचे विधि मंत्री मधुस्वामी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य केले. तसेच मुंबईवर दावाही केल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यावरून अजित पवार यांनी कर्नाटकला ताकीद देण्याची मागणी केली. त्यावर तातडीने देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत म्हणाले, कर्नाटक सरकारला राज्य सरकारच्यावतीने निषेधाचे पत्र पाठविले असून मुंबईवरील दावा खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.

मुंबई ही महाराष्ट्राचीच असून मुंबईवर दावा सांगणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिला.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री व कर्नाटक सरकारला निषेधाचे पत्र पाठविण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत नव्याने दावे केले जाणार नाहीत असे ठरले होते. आता मुंबईसंदर्भात कर्नाटक सरकारने केले ते दावे बैठकीतील ठरावाच्या विसंगत प्रकारचे दावे आहेत.

सभागृह याचा निषेध करित आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री यांना पत्राद्वारे कळविले जाईल. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर जे ठरले आहे त्याचे उल्लंघन करणे हे खपवून घेणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *