Breaking News

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत देखो आपला महाराष्ट्र टुर पॅकेज जाहीर ७५ ठिकाणी फिरण्याची संधी

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे.

पर्यटन कौशल्य विकास आणि उद्योजकता महिला आणि बाल विकास, मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली व पर्यटनाला नवीन चालना देण्याच्या दृष्टीकोनातून सदर टुर पॅकेजची आखणी करण्यात आली आहे. प्रधान सचिव (पर्यटन), सौरभ विजय, व व्यवस्थापकीय संचालक, श्रध्दा जोशी शर्मा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर टुर पॅकेज संपूर्ण महाराष्ट्रात १ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची हया भूमीत पर्यटनाशी निगडीत प्रत्येक गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याला ६ जागतिक वारसा स्थळ लाभले आहेत. खरतर आपल्या राज्यात पर्यटन स्थळांचा खजिना आहे. ९०० पेक्षा जास्त कोरीव लेण्या आपल्याकडे असून, ४०० च्या आसपास गड किल्ले आहेत. निसर्गरम्य, संदुर समुद्र किनारा, वाघ्र प्रकल्प, जैविक विविधतानी नटलेला महाराष्ट्र, जणू प्रत्येकांसाठी इथे काहीना काही आहेच.
सहयाद्री पर्वत रांगा, सातपुडा, लोणार सरोवर, कळसूबाई शिखर, संदन दरी इ. सर्वांना आकर्षित करतात.

अजिंठा व वेरुळच्या लेण्या हया सर्वानाच भूरळ घालतात. कोकणात गणपतीपुळे, तारकर्जी सारख्या समुद्र किनारे असंख्य पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. विदर्भातील वाघ्र प्रकल्प आणि वन्यजीव, नाशिक मधील मंदीरे, पुण्यातील संस्कृती आकर्षण ठरत आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हे बघूनच संपूर्ण महाराष्ट्रभर पर्यटक निवास (MTDC Resort) व उपहारागृह (Restaurant) उघडले आहेत. यामुळे पर्यटनांसाठी राहण्याची, खाणपाणाची सोय या पर्यटनाच्या मूलभूत सुविधेतून प्राप्त झाले आहेत.

पर्यटक आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासातून मनसुक्त भ्रमंती करु शकतात. एमटीडीसी पर्यटक निवास चे जाळे तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, माथेरान, खारघर एलिफंन्टा, टिटवाळा, माळशेज घाट, भंडारदरा, नाशिक, कार्ला, शिर्डी, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, छत्रपती संभाजी नगर, अजिंठा, वेरुळ, भिमाशंकर, ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, चिखदरा इत्यादी ठिकाणी पसरले आहेत.

०१ मे २०२३ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) 75 टुर पॅकेज सुरु करत आहेत. या टुर पॅकेज मधून पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवास, उपहारगृहातून आणि अनुभावत्मक पर्यटनातून घेता येईल. अनुभावत्मक पर्यटन अंतर्गत कोकणातले काताळ शिल्प, विर्दभातले वन्यजीव, भंडारदरा येथील निसर्ग भ्रमंती, गिरयारोहण, अवकाश निरीक्षण, कांदळवन इत्यादीचा अनुभव घेता येईल. सोबत गाईडची साथ असणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा विश्वास आहे की, या टुर पॅकेज मधून पर्यटकांना एक मोठी सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रत्येक व्यक्ती जाण्यास उत्सुक राहील.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *