Breaking News

राज्यातील पुरस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना उशिरा जाणीव राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उपरोधिक टीका

मुंबईः प्रतिनिधी
सततच्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात गंभीर परिस्थिती असून कोणीही राज्यकर्ता असो या संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या राजनैतिक कामात गुंतलेले होते. पण उशिरा का होईना ते त्यावर आता काम करतायत हे चांगलं असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली. काही निवडक प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

यात्रेचा निर्णय घेताना अशी परिस्थती निर्माण होईल असं त्यांना माहिती नव्हतं. पण मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. त्यांनी लक्ष घातले असतं तर लोकांची आधीच सुटका झाली असती अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात मला ओळखणाऱ्या लोकांना माझ्या अनुपस्थिबाबतचे शूद्र प्रश्न पडणार नाहीत याची मला खात्री असल्याचेही ते उपरोधिकपणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी काय बोलायला पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे. एखादं विशिष्ट वय झाल्यानंतर मॅच्युरिटी येते असं म्हणतात. ती येते की नाही ते मला माहिती नाही. ईव्हीएम बद्दल जे आक्षेप आहेत त्याचं निवडणुक आयोग बघेल त्याबद्दल सीएम का अस्वस्थ होतायंत असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
राज्यात एकाबाजूला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असताना दुसऱ्याबाजूला १३ जिल्ह्यात अजूनही टँकर्सने पिण्याचे पाणी पोहचवले जातायत. काही ठिकाणचे पाण्याचे टँकर्स कमी केलेत ती लोकं मला भेटून गेले. एकीकडे पूरस्थिती तर दुसरीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य हा मोठा विरोधाभास आहे. यावर उपाययोजना करण्याचं शहाणपण सरकारला सुचेल अशी अपेक्षा करूया असे ही ते म्हणाले.
माझ्या तोंडाचे ऑपरेशन होते. त्यामुळे मी संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकलो नाही. माझी थोडी अडचण होती. मात्र माझे सहकारी उपस्थित होते. मी एकटा न गेल्याने मोठा फरक पडेल असं वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *