Breaking News

गतीमान सरकारने सांस्कृतिक खात्याला दिले पाच वर्षात १४ संचालक संचालकांची नियुक्ती म्हणजे रेकॉर्ड ब्रेक संगीत खुर्चीचा खेळ

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात पाचवर्षापूर्वी गतीमान सरकार पारदर्शक सरकारचा नारा देत आलेल्या भाजपा-शिवसेनेने अगदीच गतीमान कारभार करत गेल्या पाच वर्षात सांस्कृतिक कार्य संचालनालायच्या संचालक पदी पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांची नियुक्ती करत “संगीत खुर्चीचा” रेकॉर्ड ब्रेक खेळ मांडल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.
खात्यात अथवा एखाद्या महामंडळात किमान दोन वर्षे तरी एखादया अधिकाऱ्याने पूर्ण वेळ काम केले, तरच त्यांना एखादी चांगली योजना किंवा धोरणाची अंमलबजावणी करायला सोयीचे जाते. परंतु पदभार स्वीकारल्यानंतर अगदी सात आठ महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्ष एखादा अधिकारी काम करून लगेच बदली मागत असेल तर तेथील खालचा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामात गांभीर्य घेत नाही. अन योजनांचा बट्ट्याबोळ होतो.
ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे दिली होती.त्यांनतर त्यांनी सांस्कृतिक कार्य विभागात नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यापैकी अनेक योजनांना अधिकारी वर्गाचा तुटवडा असल्याने गती मिळाली नाही. यामुळे महाराष्ट्रातील कलावंतांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.
मात्र या सांस्कृतिक कार्य खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालायामध्ये पाच वर्षात तब्बल चौदा अधिकाऱ्यांनी “संचालक” म्हणून वर्ष- दिड वर्षा पेक्षा अधिक काळ काम करू शकले नाही. अनेक वेळा बाह्यशक्तीच्या दबावापोटी हे अधिकारी काम करीत होते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी स्वतःहूनच संचालनालायाचा निरोप घेतल्याची चर्चा सध्या सांस्कृतिक iकार्य विभागातील अधिकाऱ्यांमध्ये आहे. काही सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कलावंत कार्यक्रम सादरीकरणासाठी पात्र नसेल तरी त्यांना काम देण्यासाठी दबाव येत असल्याची माहितीही पुढे येत आहे.

२०१४ पासून आतापर्यत संचालक पदाचा पदभार स्वीकारलेल्या अधिकाऱ्याची नावे पुढीलप्रमाणे..
१) संजय कृष्णाजी पाटील (२८ जुलै २०१४ते २३ डिसेंबर २०१४)
२) अजय आंबेकर ( २४ डिसेंबर २०१४ ते २ मे २०१६)
३)संजय कृष्णाजी पाटील ( ३ मे २०१६ ते १३ जुलै २०१६)
४) शैलेश जाधव (प्रभारी) ( १३जुलै २०१६ ते २५ सप्टेंबर २०१६ )
५)संजय कृष्णाजी पाटील ( २६ सप्टेंबर २०१६ ते २०जून २०१७)
६)सुशील गर्जे ( २१ जून २०१७ ते २४ जुलै २०१७)
७)संजय कृष्णाजी पाटील ( २५ जुलै २०१७ ते १० सप्टेंबर २०१७)
८) संजीव पलांडे (प्रभारी) (११ सप्टेंबर २०१७ ते २ ऑक्टोबर २०१७)
९) संजय कृष्णाजी पाटील ( ३ ऑक्टोबर २०१७ ते ६ डिसेंबर २०१७)
१०) सुशील गर्जे (प्रभारी) ( ७डिसेंबर २०१७ ते १६ डिसेंबर २०१७)
११) संजय कृष्णाजी पाटील (१७ डिसेंबर २०१७ ते २२ मे २०१८)
१२) संजीव पलांडे (प्रभारी) ( २३ मे २०१८ते १० ऑक्टोबर २०१८)
१३) श्रीमती स्वाती काळे ( ११ ऑक्टोबर २०१८ते ११ जुलै २०१९)
१४) बिभीषन चवरे (सध्या कार्यरत )

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *