Breaking News

जनजीवन हळुहळु पूर्वपदावर आणायचंय, घाईगर्दी करू नका भूमिपुत्रांनो संधी आहे घ्या : उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी
सद्या परवानगी देण्यात आलेल्या ५० हजार उद्योंगामधून ५ लाख कामगार काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जास्तकाळ आपल्याला घरात बसून राहता येणार नाही. मात्र लॉकडाऊन उठवला तर ब्राझील, अमेरिका, इंग्लड आदी देशात जी परिस्थिती निर्माण झालीय. तशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण हळूहळू आपले जनजीवन पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी शिस्त पाळली पाहिजे असे सांगत घराबाहेर जाताय सावध रहा हा मूल मंत्र जपावा लागणार आहे. तसेच एकदा सुरु केलेल्या गोष्टी पुन्हा बंद होवू नये यासाठी सर्वांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे. मात्र सगळ्यांनी धीर धरा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची अंमलबजाणी आजपासून सुरु झाल्यानंतर जनतेशी समाजमाध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.
कोरोनाचे संकट असतानाही राज्यातील बंद असलेल्या उद्योगापैकी ५० हजार उद्योग सुरु झालेले आहेत. त्यातच अनेक परप्रांतीय कामगार आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे मनुष्यबळ कमी असण्याची शक्यता जास्त आहे. यापार्श्वभूमीवर भूमिपुत्रांनी राज्याच्या उभारणीसाठी उपलब्ध असलेली संधी स्विकारावी असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी करत राज्यात नव्याने काही उद्योग येणार असून या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमिन राखीव ठेवण्यात आली आहेत. उद्योगांसाठी सद्यपरिस्थिती खरेदी करणे परवडणारे नसेल तर जमिनी उद्योगांसाठी भाडेपट्ट्याने देण्याची तयारी असून आगामी काळात उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार असल्याचे ग्वाही त्यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे राज्यातील संख्या वाढताना जरी आपणाला दिसत असली तरी दुसऱ्याबाजुला रूग्ण बरे होवून घरी जाण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लॉकडाऊनच्या गतीरोधकामुळे ज्या संख्येचा अंदाज वर्तविण्यात आला होता. तितकी संख्या आपण वाढू दिली नाही. तरीही रूग्णांची संख्या मुंबई, मालेगांव, ठाणे, पुणे, औरंगाबाद इथे वाढत आहे. मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यात आपल्याला यश आलं आहे. परंतु कोरोनाची साखळी अद्याप आपण तोडू शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.
ही साखळी तोडण्यासाठी आपण प्रयत्न करत असून आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेत आहोत. कोरोनावर एकमेव असे औषध नसल्याने आपणाला काळजी घ्यावी लागत आहे. मात्र या संकटावर आपण मात करून पुढे जायचे असल्याचे सांगत मुंबईतील बीकेसी, रेसकोर्स, वरळीतील डोम, मुलुंड चेक नाका इथे अडीच लाख क्षमतेचे अत्याधुनिक हॉस्पीटल्स उभारली आहेत. तसेच या संकटाचा सामना करण्यासाठी आणखी कोविड योध्द्यांची आवश्यकता लागणार आहे. ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहनही त्यांनी केले.
पावसाळ्यापूर्वी हे संकट संपवून आपल्याला नव्या जीवनाला सुरुवात करायची आहे. शाळा-कॉलेज सुरु करायचे असल्याने कोणाचेही शैक्षणिक वर्ष वाया जावू देणार नसल्याचे सांगत रेड झोनमध्ये असलेले सर्व एरिया मला ग्रीन झोनमध्ये आणायचे असल्याचे सांगत सर्वजनजीवन पूर्वपदावर आणायचे असल्याचा त्यांनी पुर्नरूच्चार केला.
स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे आणि एसटीचा वापर करत आहोत. आतापर्यंत ५ लाख स्थलांतरीत कामगारांना आपण पोहोचलो आहोत. तरीही अनेक कामगार रस्त्याने, रेल्वे ट्रॅकवरून चालत जात आहेत. तुम्ही असाल तेथे थांबा तुमच्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या त्या भागातील अधिकाऱ्यांना भेटा. ते तुमची व्यवस्था करती असे आश्वासन देत रस्त्याने चालत जावून जीव धोक्यात घालून घेवू नका असे आवाहनही त्यांनी केले.
या स्थालांतरीत कामगारांकडून एक पैसा त्यांना सोडण्यासाठी घेतलेला नाही. त्यांना मोफत प्रवास सुविधा दिली आहे. त्यासाठीचा खर्च आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून आणि काही स्वंयसेवी संस्थांनी पुढाकार घेवून केल्याचे त्यांनी सांगितल.
ग्रीन इंडस्ट्रीजला आपण विना अट उद्योग करायची परवानगी देत आहोत. मुंबई, पुणे, मालेगांव, औरंगाबाद आधी भागातील रेड झोन्स मध्ये अद्याप आपण परवानगी दिलेली नाही. मात्र हे सर्व भाग ग्रीन झोनमध्ये लवकरातलवकर आणून मगच तेथील उद्योग सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई कोकण, प.महाराष्ट्रातील लोक इथले आहेत. तुम्ही आपले आहात. त्यामुळे तुम्ही जाण्याची घाई करू नका. तुम्हालाही घरी जाण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगत उगाच घाई गर्दी करू नका जरा धीर धरा असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनासोबत जगण्याची आमची तयारी मात्र त्याची तयारी आहे का? जग बदलेल. घरात रहा आणि सुरक्षित रहा. घराबाहेर जाताना सावध रहा. संशोधन सुरु आहे. पृष्ठभागावर किती काळ जीवंत राहतो अजून कळत नाही. शिस्त पाळलीय. कारण नसताना बाहेर पडू नका, धार्मिक कारण उत्सव यांना परावनगी दिली नाही. दुकाने सुरु करायला हळू हळू परवानगी देणार असल्याचे सांगत परवानगी देण्याआधी सर्वांना सांगणार त्यानंतर गोष्टींना परवानगी देणार असल्याचे सांगत पावसाळ्यापूर्वी हे संकट संपवायचाय. जनजीवन रूळावर आणायचंय, सहजतेने जगायला सुरुवात करायचीय. काही काळ जावा लागणार. साखळी तोडण्यात यशस्वी होवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *