Breaking News

दोनच आव्हानं, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं सर्वांच्या सहकार्याने मात करणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देतांना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन करत राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं असल्याचे त्यांनी सांगितले.

या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे. आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. सध्या सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात, अशा वेळी दिव्याजवळ हात नेल्यास अपघात होऊ शकतो. त्याबाबतही सावध राहण्याची सूचना करत राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपापल्या घरातंच पूजा-अर्चा, प्रार्थना करावी

भगवान महावीर जयंतीनिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देत भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला. प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं हा त्यांचा विचार आपण सर्वानी आचरणात आणला पाहिजे, राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन यावर्षी नागरिकांनी महावीर जयंती, आणि इतर सणाच्या निमित्ताने घराबाहेर पडू नये, आपापल्या घरातंच पूजा-अर्चा, प्रार्थना करावी, असं आवाहनही त्यांनी केल.

Check Also

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना ४८ तास प्रचार करण्यास बंदी

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख के चंद्रशेखर राव यांना लोकसभा निवडणुकीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *