Breaking News

संजय निरूपम म्हणाले, माफी मागायला लावली म्हणून… लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हिंदूत्वाचा मुद्दा आणला

उत्तर प्रदेशातून वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नियोजित पाच जूनचा अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच माफी मागायला लावली म्हणून राज ठाकरे हिंदूत्वाचा मुद्दा सोडून देणार की काय य़ाची मला भीती वाटत असल्याचेही संजय निरूपम म्हणाले.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
अयोध्येचा दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दाच सोडून देतात की काय असं वाटतंय. माझा त्यांनी अयोध्येला जाण्याला विरोध नव्हता. कोणालाही अयोध्येला जाण्याचा, भगवान श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होण्याचा अधिकार आहे. सर्व हिंदू आणि गैरहिंदूंना देखील अयोध्येला जाण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे उत्तर भारतात जात आहेत तर आधी त्यांनी उत्तर भारतीयांना दिलेल्या त्रासाबद्दल माफी मागावी अशी मागणी मी केली होती. आजही मी ती मागणी करतो. त्यांना माफी मागावी लागेल आणि मागायला हवी असेही ते म्हणाले.
मी १५-२० दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की, राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा उचलत आहेत, अयोध्येला जात आहेत तर त्यांनी नक्की जावं. मात्र, त्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मी केली होती. यानंतर देशभरातून अशी मागणी सुरू झाली. मुंबईतही केवळ काँग्रेस नाही, तर वेगवेगळ्या पक्षांकडून ही मागणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी माफी मागावी ही मागणी होत आहे कारण त्यांनी आपला पक्ष प्रसिद्धीत आणण्यासाठी मुंबईत विनाकारण गरीब उत्तर भारतीयांवर हल्ले केले. त्यांनी फेरीवाले, रिक्षावाले, ऑटोवाले, टॅक्सीवाले यांना मारहाण केली आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. ते दुःख नक्कीच आजही मुंबईतील आणि संपूर्ण उत्तर भारतीयांच्या मनात आहे. अशावेळी ते उत्तर भारतात जात आहेत तर ही मागणी होणारच होती असेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरच्या आडून हिंदूत्वाचा मुद्दा आणला होता. मात्र ते हिंदूत्व नाहीच. वास्तविक पाहता त्या मुद्याआडून त्यांना दोन समाजात भांडण लावण्याचा कार्यक्रम त्यांनी आणला होता. कोणाच्या तरी सांगण्यावरून ते भांडण लावण्याचा प्रयत्न करत होते. हिंदूत्वाचा मुद्दा घेत असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. परंतु त्यांनी मूलभूत प्रश्नावर काम करायला हवे भांडणे लावून, दंगे घडवून हिंदूत्वाचा विचार पुढे आणू नये असा सल्लाही त्यांनी राज ठाकरे यांना दिला.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *