Breaking News

लाल महालात लावणीचे चित्रिकरण, अभिनेत्री वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता म्हणून पुण्यातील लाल महालाकडे पाहिले जाते. मात्र लाल महाल बंद असताना महालाचे रिल्स काढायचे असल्याचे सांगत एका चित्रपटाच्या लावणीच्या नृत्याचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारीत केल्याप्रकरणी लावणी गाण्यावर नृत्य करणारी नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांच्या विरोधात शिवप्रेमी संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबतची तक्रार फरासखाना रोड येथील पोलिस स्थानकात नोंदविण्यात आली.
लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. हजारो पर्यटक लाल महालला भेट देण्यासाठी दररोज येत असतांनाही काही कारणांनी पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. तर याच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारीत रिल्सचे शुटिंगचे करण्यात आले.
लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याप्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली.
जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केलं आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती.
जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. ज्या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना केली.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *