Breaking News

मुख्यमंत्री कार्यालय म्हणते, परमबीर सिंग नावाचे पत्र मिळाले पण त्यावर सही नाही ई मेलवरून प्राप्त झाल्याने त्याची सत्यता तपासणार

मुंबई: प्रतिनिधी

आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या सही नसलेले पत्र समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने त्यावर एकच राजकिय गदारोळ उडाला. या पत्रावर सही नसल्याने आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून सदरचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने करत सदर पत्राची सत्यता तपासणार असल्याचे रात्री उशीराने प्रसारमाध्यमांना सांगितले.

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे , त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

या पत्रावर सही नसल्याने या पत्राच्या सत्यतेबाबत सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तसेच इतके गंभीर आरोप मुंबई पोलिस आयुक्त राहीलेला व्यक्ती कसा करू शकेल असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कार्यालयानेच या पत्राची सत्यता आणि पत्र पाठविण्यासाठी ज्या ई-मेलचा पत्ता वापरण्यात आला. त्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याची चौकशी झाल्यानंतरच पत्र खरे की खोटे याबाबतचे उत्तर मिळेल.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *