Breaking News

मुंबई व परिसरातील पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा: ३ दिवस पावसाचा इशारा पाण्याचा निचरा आणि वाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी

हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे आवश्यकता आहे तिथे मदत कार्य व्यवस्थित सुरू राहील हे पाहण्यास सांगितले. तसेच कोविडसह इतर कोणत्याही स्वरूपाच्या रुग्णसेवेत अडथळा निर्माण होणार नाही हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

मुंबईत पंपींग स्टेशन्स कार्यरत राहतील व साचलेले पाणी लगेच उपसा कसा होईल ते तातडीने पाहावे. तसेच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक मंद किंवा थांबलेली असेल तिथे पोलीस व इतर यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करून अडथळे दूर करावेत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि विविध उपाययोजनांची त्यांना माहिती दिली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *