Breaking News

मुख्यमंत्री फडणवीसांचे गुजरातवर प्रेम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी सतत गुजरात राज्याचे नाव असते. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुडजरातवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी करत  कोकणातील नाणार रिफायनरीला विरोध होत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी शक्यता वर्तवल्याने मुख्यमंत्र्यांना सध्या गुजरातशिवाय काहीही दिसत नसल्याची टीकाही केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवास्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पण वारंवार गुजरातचे नाव घेण्याचे कारण तरी काय ? मुख्यमंत्र्यांवर कुणाचा  दबाव  आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

पश्चिम महाराष्ट्रातल्या हल्लाबोल आंदोलनाच्या  दरम्यान  शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याचे दिसून आले. अनेकांना कर्जमाफीचा लाभ ही मिळाला नाही. राज्यात एकही नवा उद्योग सुरु झाला नाही ,सरकारने केवळ कोट्यवधी रुपये खर्चून मेक इन इंडिया आणि मॅगनेटीक महाराष्ट्र सारखे इव्हेंट केले आहेत, त्यातून एकही रोजगार अद्याप निर्माण झाला नाही. त्यातच सरकारने शासकीय भरती रोखली आहे. अनेक जिल्हा बँकेत अनेकांना रोजगार मिळू शकला असता पण त्यावरही सरकारने स्थगिती दिल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यातले रोजगाराभिमुख प्रकल्प आणि कार्यालये मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे गुजरातला गेले . मात्र नाणार चा रासायनिक प्रकल्प कोकणात राबवण्याचा निर्णय घेतला जातोय. आघाडी सरकार असताना कोकण सारख्या निसर्गसौंदर्य असणाऱ्या प्रदेशात रासायनिक प्रकल्प होऊ नये अशी आमची भूमिका होतीं , आता ही नाणारबाबत तीच भूमिका आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार १० मी रोजी नाणारला भेट देणार असून त्यानंतर ते भूमिका मांडतील असेही तटकरे यांनी सांगितले.

तसेच येत्या सहा मे पासून राष्ट्रवादीचा कोकण हल्लाबोल मोर्चा सुरु होत असून या आंदोलनादरम्यान ही जनतेच्या भावना समजून घेऊ असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांचे वडील निर्दोष असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी यावेळी देवून टाकले.

 

Check Also

परराष्ट्र मंत्रालयाची तीव्र नाराजी, अमेरिकेचा मानवी हक्क अहवाल हा पक्षपाती

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की यूएस स्टेट डिपार्टमेंटने जारी केलेला मानवी हक्क अहवाल “खूप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *