Breaking News

युतीसाठी शिवसेनेची तयारी नसले तर भाजपही स्वबळावर निवडणूक लढवेल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचाही इशारा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात शिवसेनेने स्वबळावर निवडणूका लढविण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. मात्र युतीसाठी शिवसेनेची तयारी नसेल तर भाजपही स्वबळावर निवडणूकीला सामोरे जात २८८ जागी निवडणूक लढवित सत्ता मिळवू असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला दिला.

विशेष म्हणजे राज्य सरकारने प्लास्टीक बंदी संदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे हे मंत्रालयात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यावरील वरील इशारा दिला.

मागील काही दिवसांपासून युतीसंदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज सोमवारी भेटणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र त्यांची आजची होणारी भेट  दोन दिवसानंतर होणार आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, उध्दव ठाकरे यांच्यासोबत आज कोणतीही भेट ठरली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच युती भाजपची मजबुरी नसून युती तर्कावर आणि आकड्यांवर होते. भावनेवर युती होत नसल्याचे सांगत आगामी निवडणुकांत युती व्हावी यासाठी कोणाचाही कुणावर दबाव नाही. युती ही भाजपाची मजबुरी नाही, शिवसेनेला जर वेगळं लढायचं असेल आणि त्याची भूमिका भाजपला सोबत घ्यायचं नाही अशीच असेल तर आम्ही देखील वेगळं लढण्यासाठी तयार आहोत, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  युतीचा निर्णय भावनेवर आधारित नाही, तर तर्क व आकड्यांवर त्याबाबतचा निर्णय होईल, तुर्तास तरी या विषयावर दोन्ही बाजूच्या नेत्यांत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाणार प्रकल्प महाराष्ट्रात व्हायचा नसेल तर गुजरातला आंदण द्यायचा का? गुजरात १ लाख रोजगार देणाऱ्या या प्रकल्पाचे स्वागतच करेल,असे मुनगंटीवार म्हणाले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नेमके काय आणि कितपत नुकसान होणार हे देखील समजून घेण्याची गरज असून केवळ विरोधाला विरोध नसावा असेही त्यांनी नाणार प्रकल्पाबाबत बोलताना सांगितले.

 

 

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *