Breaking News

मुख्यमंत्र्यांमुळेच पोलिसांची पगार खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची काँग्रेस नेते नाना पटोले यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे वर्ग करताना मुख्यमंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग केला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रचार समितीचे अध्यक्ष माजी खा. नाना पटोले यांनी केली.
गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग केल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. स्व. विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना २००५ सालीच पोलिसांची पगाराची खाती अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता असा दावा मुख्यमंत्र्यांनी नुकताच एका मुलाखतीत केला. मात्र त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सांगून स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या काळात पोलिसांची पगार खाती वर्ग करण्यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या १५ बँकांची नावे होती. त्या शासनिर्णयात ही खाती एकट्या अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग करावीत असे म्हटले नव्हते अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र 2017 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस मुख्यालयातून एक परिपत्रक काढण्यात आले आणि पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेतून करण्याचा निर्णय झाला. याविरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातील गडबड लक्षात आल्याने न्यायालयाने या याचिकेचे जनतहित याचिकेमध्ये रूपांतर करून घेतले. याचाच अर्थ न्यायालयाला याचे गांभीर्य समजले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीला आहेत. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्र्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून अ‍ॅक्सिस बँकेला मदत केली म्हणूनच अमृता फडणवीस यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी बढती झाली का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *