Breaking News

रवी राणांना मार्शलकरवी विधानसभा सभागृहाबाहेर काढले चर्चा सोडून मध्येच आंदोलन केल्याने कारवाई

मुंबईः विशेष प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणप्रश्नी मांडलेल्या ठरावावरून सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना चांगलाच रंगला. त्यामुळे विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांकडून देण्यात येत असलेल्या धमक्या, फोन टँपिंग आदींसह विविध विषयावर चर्चा सुरु होती. त्यावेळी नेमके भाजपाचे समर्थक तथा अपक्ष आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरील राजदंड उचलून एकट्यानेच बँनर फडकावून आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी राणा यांना मार्शलकरवी विधानसभा सभागृहाबाहेरचा रस्ता दाखविला.

ओबीसी प्रश्नी केंद्र सरकारकडून इंम्पिरियल डेटा मिळावा यासाठी विधानसभेत ठराव मांडून आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यास विरोध म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. त्यानंतर सरकारकडून भाजपाचे १२ आमदार निलंबित केले. त्यामुळे भाजपाचे सदस्य आणखीच चिडले आणि त्यांनी भास्कर जाधव यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत सोशल मिडियातून त्यांना धमक्या देण्यात असल्याप्रकरणीचा मुद्दा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी स्वतःच उपस्थित केला.

त्यावर चर्चा सुरु असतानाच भाजपाचे समर्थक आमदार रवी राणा यांनी अचानक मध्येच उठून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करा आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय द्या अशी मागणी करत थेट अध्यक्षाच्या आसनाकडे एकट्यानेच धाव घेत बँनर फडकाविला. तसेच अध्यक्षांच्या आसनासमोरील राजदंड उचलून घेत शेतकऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

त्यावर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी मार्शल यांना आदेश देत त्यांना थेट सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यावर सत्ताधारी बाकावरून एका सदस्याने राजदंड त्यांच्या हाती असल्याने तो काढून घ्यावा अशी मागणी केली. त्यावर जाधव पुन्हा म्हणाले की, राजदंड नेला तरी सभागृहाचे कामकाज थांबणार नाही. ते असेच पुढे चालू राहील. तसेच रवी राणा यांचा हेतू स्पष्ट आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची आहे. इथल्या सगळ्यांची पण आहे. त्याविषयीचा प्रस्ताव आजच्या कामकाज पत्रिकेत आहे. त्यावरील चर्चेच्या वेळी त्यांनी आपले मुद्दे मांडावेत अशी सूचना केली.

तरीही राणा यांनी हातातील राजदंड हातातून सोडला नाही. त्यावेळी ते म्हणाले की आता ही त्यांची स्टंटबाजी आहे. त्यामुळे त्यांना मार्शलनी सभागृहाच्या बाहेरच काढावे असे निर्देश दिले. तसेच अशा गोष्टींना बाकिच्या सदस्यांनी फारसे महत्व देवू नये असे आवाहनही जाधव यांनी यावेळी सर्व सदस्यांना केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *