Breaking News

“ठाकरे सरकारला झुकावं लागेल”, असे म्हणत सोमय्या कोल्हापूरकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सीएसटीएमहून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू

मुंबई : प्रतिनिधी

कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल असा इशारा देत अखेर किरीट सोमय्या यांनी संध्याकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे रवाना झाले.

मुंबई पोलिसांनी चार तास स्थानबद्ध केल्यानंतर अखेर गणपती विसर्जन करण्यासाठी गिरगांव चौपाटी जाणार आणि पुढे अंबेमाईचे आशिर्वादही घेणार असा ठाम निर्धार व्यक्त करत ठाकरे सरकारला झुकावं लागेल असा इशारा त्यांनी दिला.

महालक्ष्मी एकस्प्रेसने जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकात पोहोचल्यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी अनेक पध्दतीने समजावायचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याबाबत ठाम राहिले. तसेच तुम्हाला रोखायचे असेल तर कोल्हापूरच्या वेशीवर रोखा असे इथे तुम्ही मला रोखू शकत नाही असे पोलिसांना सांगितले. तरीही पोलिसांनी अनेक पध्दतीने त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. परंतु सोमय्या आमल्या मतावर ठाम राहिल्याने अखेर पोलिसांनी त्यांना महालक्ष्मी एक्सप्रेसने जाण्यास परवानगी दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आदेशानुसार हे माझ्याविरोधात रचण्यात आलेले कट कारस्थान असून त्यांच्या आदेशानुसार हे मला रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

तसेच ठाकरे सरकारचे पोलिस मला कोल्हापूरला पोहोचण्याआधीच मला मध्येच उतरविणार याची मला खात्री आहे. त्याचबरोबर मला कितीही विघ्न आली तरी मी कोल्हापूराला जाणार आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात कोल्हापूर आणि कागल येथील पोलिस स्थानकात जावून तक्रार जावून नोंदविणार असा ठाम निर्धार व्यक्त करत मुश्रीफ यांच्या विरोधातील आणखी एक घोटाळा मी उघडकीस आणणार आणि त्यांना तुरुंगात पाठविणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

पोलिस स्टेशनला जावून तक्रार नोंदविणार नसाल तर आम्ही तुम्हाला कोल्हापूरला जायला परवानगी देवू असे मला सांगण्यात येत आहे. यासंदर्भात पोलिस मला म्हणतात काहीही केले तरी तुम्हाला कोल्हापूरला न जावू देण्याचे आदेश दिल्याचे सांगत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *