Breaking News

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीनंतर ब्रिजभूषण सिंग म्हणाले, आम्ही तिथे… पाच तारखेला अयोध्येत पुजा-अर्जा करणार

अयोध्या दौरा जाहिर केल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. परंतु आता राज ठाकरे यांनीच आज सकाळी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचे जाहिर केले. तसेच मनसैनिकांनी रविवारच्या सभेला यावे आपण त्यावर बोलू असे सांगितले. यापार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग म्हणाले की, राज ठाकरे आले नाहीत तरी पाच तारखेला आम्ही अयोध्येत पुजा-अर्जा करणार असल्याचे सांगत त्यादिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे स्पष्ट केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनीच ट्विटरवरुन दिली. राज यांची तब्बेत ठीक नसल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचं सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय. पुण्यातील सभेमध्ये आपण यावर सविस्तर बोलणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे हे अचानक पुणे दौऱ्यावर मुंबईला परतल्यापासूनच त्यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल चर्चांना उधाण आलं होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम देत राज यांनी दौरा स्थगित झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा होता तीव्र विरोध आहे. उत्तर भारतीयांची माफी मागा आणि मगच अयोध्याला या अशी ब्रिजभूषण सिंग यांची अट आहे.
आम्ही पाच जून रोजी अयोध्येमध्ये शरयू नदीत स्नान करणार आहोत. तेथील साधू-संतांसोबत आम्ही पूजा-पाठही करणार आहोत. राज ठाकरेंनी त्यांचा दौरा स्थगित केला असला तरी आम्ही तिथे नक्की जाणार आहोत. आम्ही योगी आदित्यनाथांचा वाढदिवसही तिथे साजरा करणार असल्याचेही खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस पाच जून रोजीच आहे. यानिमित्ताने भाजपा खासदाराकडून विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. फेसबुकवरुनही त्यांनी यासंदर्भातील एक पोस्ट केलीय.
दरम्यान, पुण्यातील सभेनंतर राज डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. सल्ल्यानुसार दौऱ्यासंदर्भातील पुढील तारीख आणि धोरण निश्चित केलं जाईल. राज यांच्या पायासंदर्भातील समस्येवर उपचार म्हणून शस्त्रक्रिया करण्याची पुन्हा गरज लागू शकते असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज असल्याचंही सांगितलं जात आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *