Breaking News

नवनीत राणाच्या फोटोवरून शिवसेना झाली आक्रमकः लीलावतीत मारला ठिय्या फोटो कसे काढले शिवसेना महिला नेत्यांचा प्रशासनाला सवाल

१४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. तेथे त्या तीन-चार दिवस असताना त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेलेल्या भाजपा नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर एमआरआय करतानाचा फोटोही व्हायरल झाला.
वास्तविक पाहता एमआरआय करताना त्या रूममध्ये कोणत्याही स्वरूपाची वस्तू नेण्यास कोणत्याही रूग्णालयात परवानगी दिली जात नाही. त्याचबरोबर व्यक्तीचा एमआरए करताना फोटो काढण्याची परवानगीही दिली जात नाही. मात्र लीलावती रूग्णालयात एआरआय काढतानाच फोटो व्हायरल झाल्याने हा फोटो कोणी काढला, एमआरआय काढताना फोटो काढण्यास परवानगी आहे का ? राणा यांचा रिपोर्ट द्या आदी मागण्यांवरून आज शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार मनिषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक महिला कार्यकर्त्यांनी लीलावती रूग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले.
त्यांनी रुग्णालय प्रशासनास विविध प्रश्न विचारून जोपर्यंत याचे उत्तर दिले जात नाही तोपर्यंत आम्ही रुग्णालयातून हलणार नसल्याची भूमिका घेतली.
नवनीत राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का?, एमआरआय करताना व्हीडीओ शुटींग आणि फोटो कसे काढले गेले? रुग्णलायाचे नियम सर्वांना समान हवेत. त्यांचा तपासण्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत आम्ही जाणार नाहीत. असं म्हणत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.
रुग्णालयात फोटोग्राफी आणि शुटींग करण्यासाठी कोणी दबाव आणला आहे का? याचा तपास झाला पाहिजे. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमांना दिली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *