Breaking News

सभेआधीच राज ठाकरेंना धक्का, पुण्यातील मनसे कार्यकर्त्ये लवकरच शिवसेनेत पुण्यातील सभे आधीच मनसे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. त्यामुळे पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच काही मनसेतील अनेक कार्यकर्त्ये शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
येथील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकण्याच्या तयारीत असून २२ मे या मनसेच्या पुण्यातील सभे आधीच पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरात मनसेला गळती लागणार असे दिसते. पुण्याचे मनसे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे मनसे सोडण्याच्या तयारीत आहेत. मनसेतून शिवसेनेत जाणार असल्याचे कळते.
पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून निलेश माझीरे यांची ओळख आहे. ते पुण्यातील मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष होते. पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी यामुळे निलेश माझीरे पक्षाला रामराम ठोकणार आहेत. दरम्यान त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली आहे. येत्या दोन दिवसांत माझीरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने मनसेत खळबळ उडाली आहे.
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी तब्येतीच्या कारणावरून दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर ते आता पुण्यात २२ मे रोजी सभा घेणार आहेत. त्याआधीच कट्टर कार्यकर्ते निलेश माझीरे मनसेला रामराम ठोकणार असून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यासंदर्भात शिवसेना नेते सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मागील आठवड्यात सचिन माझीरे आणि आपली भेट मुंबईत झाली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी दाखविली. तसेच त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम येत्या २२ तारखेपर्यंत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *