Breaking News

ज्ञानवापी मस्जिदीचा सर्व्हेक्षण अहवाल देण्याआधीच हिंदू समाजाच्या वकीलाने केला “हा” दावा न्यायालयाच्या निर्णया आधीच दावा केल्याने मुस्लिम समुदायांकडून सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

वारासणीमधील ज्ञानवापी मस्जिद ही पूर्वीचे हिंदू मंदिर असल्याचा दावा करत वाराणसी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. त्यावर अखेर न्यायालयाने ज्ञानवापी मस्जिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन ते तीन दिवस चित्रीकरणाद्वारे सर्व्हेक्षण आज सोमवारी शांततेत पूर्ण करण्यात आले. या चित्रीकरणाचा अहवाल न्यायालयात सादर होऊन न्यायालयाचा निकाल हाती येण्यापूर्वीच हिंदू समाजाच्या वकिलाने मस्जिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे.

रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण आज म्हणजेच सोमवार, १६ मे रोजी पूर्ण झाले. या सर्वेक्षणासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी हा दावा केला असून फोनवरुन दिलेल्या माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरात असणाऱ्या विहिरीमध्ये शिवलिंग सापडल्याचा दावा केला. या शिवलिंगाचे संरक्षण आणि जतन केले जावे या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयामध्ये अर्ज करणार असल्याचेही ते म्हणाले.

जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग १२ फूटांचे असून बाजू मांडणारे दुसरे वकील मदन मोहन यादव यांनी हे शिवलिंग म्हणजे नंदीचा चेहरा असल्याचा दावा केला आहे.

गेल्या आठवडय़ात या मस्जिदीच्या व्यवस्थापन समितीने आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबले होते. सर्वेक्षणासाठी न्यायालयाने नियुक्त केलेल्या विधि आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीने केला होता. मात्र न्यायालयाच्या परवानगीने हे सर्वेक्षण सुरू झाले. महिलांच्या एका समूहाने या मस्जिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे.

रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली.

याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती. सर्व्हेक्षणानंतर न्यायालयाने मस्जिद सील करण्याचे आदेश दिले.

दरम्यान मस्जिदीचे सर्व्हेक्षण थांबवावे या मागणीसाठी मुस्लिम समुदायाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुणावनी होणार आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *