Breaking News

भाजपाचा उमेदवार नसला तरी ऋतुजा लटके यांचा ‘या’ उमेदवारांशी सामना प्रचार संपला आता ३ तारखेला मतदान

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार आज मंगळवारी संध्याकाळी संपला. या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर गुरूवारी मतदान होणार असून रविवार ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहिर होणार आहे. अंधेरी पूर्व या एका पोटनिवडणुकीने राज्यातील राजकारण जोरदार तापले होते. उमेदवारी कोणाला इथपासून उमेदवार माघारीपर्यंत अनेक राजकीय नाटये या निवडणुकीत रंगली. मात्र भाजपाच्या मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या निवडणुकीतील रंगत अखेर संपली. तरीही या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋुतुजा लटके यांना ६ उमेदवारांशी सामना करावा लागणार आहे. त्यामुळे लटके यांना कितीचे मताधिक्क मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेना आताची शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मिक निधन झाले होते. यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. उध्द ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गट लढणार की भाजपा असा प्रश्न होता. मात्र भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र नंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनानंतर भाजपाने आपला उमेदवारे मागे घेतला.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत होत्या. त्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला होता. मात्र हा राजीनामा देखील वादात सापडला. राजीनामा मंजूर व्हावा यासाठी त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. अखेर न्यायालयीन लढाईनंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या मतदारसंघात भाजपाने निवडणूक लढवू नये अशी विनंती करताना राज्याच्या राजकीय संस्कृतीची आठवण करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील असेच आवाहन केले. बाळासाहेबांची शिवसेनेचे अर्थात एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील तसे पत्र दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे जाहीर केले. त्यानुसार संध्याकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाने उमेदवार मागे घेत असल्याचे जाहीर केले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. उदधव ठाकरे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना तसेच भाजपा असे शक्तीप्रदर्शन होणार होते. मात्र भाजपाने उमेदवार मागे घेतल्याने या निवडणुकीतील रंगत संपली आहे. आता या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. ३ तारखेला मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार
ऋतुजा लटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बाला व्यंकटेश विनायक नाडार ( आपकी अपनी पार्टी, पीपल्स )
मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
नीना खेडेकर ( अपक्ष)
फरहाना सिराज सय्यद ( अपक्ष)
मिलिंद कांबळे ( अपक्ष)
राजेश त्रिपाठी ( अपक्ष)

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *