Breaking News

मुंबई

मुंबईच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘टुरिझम सर्किट’साठी बस सेवा सुरु करा इंदू मिल येथील स्मारक जागतिकस्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल - राज्यपाल रमेश बैस

इंदू मिल दादर येथे तयार होणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री …

Read More »

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन आठभर चित्रप्रदर्शन राहणार

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये …

Read More »

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच आता मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची माहिती

मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करण्यात येत आहे. शासनाचा कारभार पारदर्शक होण्यासाठी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागात ई-ऑफिस होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून, शासनाचा कारभार हा लवकरच कागद विरहित (Paperless) करण्याचा शासनाचा मानस असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या रावणराज च्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, त्यांच्या जन्मा… बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी अयोध्येला जाणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा पर्यावरणवाद्यांना दिलासा, आरे आंदोलकांवरील गुन्हे रद्द पर्यावरण वाद्यांकडे कोणतेही आक्षेप साहित्य नाही

मेट्रो ३ प्रकल्पाचा आरे कारशेडचा मुद्दा गेल्या तीन वर्षात प्रचंड तापला. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात युती सरकार होतं. तेव्हा सत्ताधारी शिवसेनाच भाजपच्या विरोधात उभी राहिली होती. मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत होऊ नये. आरेतील झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षदेखील आक्रमक झालेला बघायला मिळाला. याशिवाय पर्यावरण प्रेमींनी तर प्रचंड मोठं …

Read More »

त्या पोलिसी कारवाईवरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, असे किती जणांना अटक करणार “भोंगळी” हे रॅप गाणे करणाऱ्या कलाकाराच्या आई-वडीलांना पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवले

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर …

Read More »

प्रकल्प संचालक कैलास पगारे यांची तंबी, प्रशिक्षकांना वेळेवर मानधन अदा करा अन्यथा… व्यवसाय प्रशिक्षण संस्थांवर दिला कारवाईचा इशारा

राज्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण संस्थांमार्फत व्यवसाय प्रशिक्षक नियुक्त केले जातात. त्यांना वेळेवर मानधन अदा न केल्यास, अशा संस्थांविरूद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रकल्प संचालक कैलास पगारे म्हणाले, …

Read More »

शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, शिवीगाळ सुरु झाली म्हणून थोडी धक्काबुक्की झाली…. त्या महिलेला मारहाण केली नाही

ठाण्यात घडलेल्या एका प्रकाराची आज सकाळपासून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाण्यात शिंदे गटाच्या काही कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातलं एक सीसीटीव्ही फूटेजही सध्या व्हायरल होत आहे. यावरून शिंदे गटावर आणि संबंधित महिला कार्यकर्त्यांवर टीकाही केली जात असताना …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक टीका, मुख्यमंत्री म्हणण्याऐवजी गुंडमंत्री म्हणा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उध्दव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन घेतली सपत्नीक भेट

ठाण्यातल्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना समाज माध्यमावरील एका पोस्टवरून शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण प्रकरणाचे पडसाद चांगलेच उमटताना दिसत आहेत. रोशनी शिंदे यांची आज रूग्णालयात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबईतील ‘हे’ एमयुटीपी प्रकल्प वेळेत पूर्ण करा सर्व प्रकल्प कालबध्द पध्दतीत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टस (एमयुटीपी) हे मुंबई महागनर (एमएमआर) क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी राज्य शासनाच्या संबंधित सर्व यंत्रणांनी भू-संपादन, पुनर्वसन यांसह आर्थिक सहभागाच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही …

Read More »