Breaking News

त्या पोलिसी कारवाईवरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, असे किती जणांना अटक करणार “भोंगळी” हे रॅप गाणे करणाऱ्या कलाकाराच्या आई-वडीलांना पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवले

“भोंगळी” हे रॅप गाणे तयार करणारा तरुण कलाकार उमेश खाडे आणि त्याच्या आई-वडीलांना वडाळा पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवले आहे. या गाण्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही. त्याने कोणाचेही नाव घेतलेले नाही. आपल्या गरीबीवर तो या गाण्यामध्ये व्यथीत होऊन बोलला आहे. आता व्यथा व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल, तर मग कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणा-या प्रत्येकालाच अटक करा. असे किती जणांना तुम्ही अटक करणार आहात. तुम्ही लोकांच्या भावना अश्याप्रकारे दाबू शकत नाही. हे पोलीसी राज नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

रॅप तयार करणाऱ्या कलाकार उमेश खाडे यांच्या आईवडीलांना वडाळा पोलिस स्टेशनमध्ये बोलावून व़डाळा पोलिसांनी डांबून ठेवले असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या घटनेची माहिती देण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारला ट्विटद्वारे इशारा दिला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुढे लिहिताना म्हणाले, लोकशाहीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही असे आपल्याला चिरडू देणार नाही. उमेश खाडेला लगेच सोडा. पोर-पोरींनो व्यक्त व्हा… फासा लटकवणार का … मी कायम तुमच्या बरोबर आहे .. आपला गळा दाबत आहे. तर तुकाराम जेल मध्येच बसले असते. ह्यांनी तर नामदेव ढसाळ ह्यांना आयुश्य भर जेल मध्ये बसवले असते असे सांगत विद्रोह हा महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहे असेही ठामपणे सांगितले.

तसेच मी सगळ्या #Rappers ला एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी जाहिर करत … आपल्या भाषेत व्यक्त होणे हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे…विद्रोह हा बुद्धा पासून तुकारामा पर्येंत सगळयांनी केला. शीव, शंभु, फुले, आंबेडकरांनी ही विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सांगितले.

Check Also

वडापावच्या गाडीवर कारवाई; कष्टकऱ्यांची मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

एकाबाजूला केंद्र आण राज्य सरकारकडून २८ कोटीपैकी २२ कोटी नागरिकांना विविध गरिबीरेखेच्या बाहेर काढले. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *