Breaking News

मुंबई

अंधेरी पूर्व निवडणूकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस, ही बंधने लागू होणार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध देखील लागू होत आहेत; या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, …

Read More »

परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले, दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांना आळा घालणे आवश्यक

दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत (२६/११) झालेल्या भीषण दहशतवादी …

Read More »

कौशल्य विद्यापीठाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटीचे शिक्षण

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर २०२२ पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, मुंबईकरांसाठी राज्य सरकार वेगाने निर्णय घेतेय चर्नी रोड रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सुरु

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन वेगाने निर्णय घेत आहे. शहराचे सौंदर्यीकरण वाढवणे, अधिकाधिक मुलभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यामुळेच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरु करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील …

Read More »

न्यायालयाचा सवाल, राऊत यांच्या बोलण्याची ईडीला अडचण नाही तर तुम्हाला का…? बोलण्यास अटकाव करणाऱ्या पोलिसांचे कोर्टाने उपटले कान

पत्राचाळ प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्याऐवजी राऊत यांना २ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच त्यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला. मात्र आज सुनावणीवेळी न्यायालयाच्या आवारात प्रसार माध्यमांशी राऊत यांच्या बोलण्याचा मुद्दा …

Read More »

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अडथळा ठरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत भाजपा आ. भातखळकरांची मागणी

मुंबई शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांनी उच्छाद आणला आहे. सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करण्यात अडथळा आणणाऱ्याांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश नुकतेच प्रशासन यंत्रणेला दिले आहेत. या निर्देशाची तत्काळ अंमलबजावणी करून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मोहीम तीव्र करावी, अशी …

Read More »

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीएच्या पत्राला बिल्डरकडून वाटाण्याच्या अक्षता

मागील सहा वर्षाहून अधिक काळ राज्याचे नगरविकास मंत्री आणि सद्यस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून जाहिर कार्यक्रमातून सांगत असतात. मात्र त्यांच्याच कार्यकाळात प्रकल्प बाधित नागरीकांना इमारत बांधून त्यांचे पुर्नवसन केले. परंतु त्या प्रकल्प बाधित नागरिकांना विकासकाने गळकी इमारत बांधून दिल्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेकडे तक्रारीही …

Read More »

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या …

Read More »

अंधेरी पोटनिवडणूकः भाजपाच्या उमेदवारासह ७ जणांचे अर्ज मागे, ७ अद्यापही रिंगणात

अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणूकीत आज भाजपाने जाहिर केल्याप्रमाणे ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांच्यासह इतर ७ उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्यासह ७ जणांमध्ये आता निवडणूक होणार आहे. अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता …

Read More »

पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. ४० वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेन्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलिसांच्या संपूर्ण …

Read More »