Breaking News

मुंबई

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईसाठी आणखी १२०० प्रकल्प हाती संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प

मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प शासनाने केला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शहाजीराजे क्रीडा संकूल अंधेरी येथे मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत पूर्व व …

Read More »

राज्य सरकारने एसटीला दिले ऑक्टोबरच्या वेतनासाठी २०० कोटी राज्य सरकारने ३६० कोटी द्यावेत, कर्मचारी संघटनेची मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन थकले असून शुक्रवारी राज्य सरकारने महामंडळाला २०० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही रक्कम अपुरी असून दरमहा वेतनासाठी ३६० कोटी रुपये द्यायला हवेत, असे एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने स्पष्ट केले आहे. एसटी महामंडळाने मागील थकबाकी आणि ऑक्टोबरच्या वेतनासाठी सरकारकडे ७९० कोटी रुपयांची मागणी केली …

Read More »

शिंदे गटाच्या आमदार-खासदारांवरील कारवाईप्रश्नी ईडी विरोधात याचिका अँड. नितीन सातपुते यांनी दाखल केली याचिका

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेचे आमदार आणि खासदारांना ईडीने अर्थात सक्तवसुली संचालनालयाने नोटीसा पाठविल्या. मात्र ज्यांना नोटीसा पाठविल्या त्या आमदार-खासदारांनी शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारत भाजपाशी हातमिळवणी केली. त्यानंतर या ईडीने काय कारवाई केली? की या सर्वांनी भाजपाशी हातमिळवणी केली म्हणून पुढची कारवाई …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विविध ५०० कामांचे मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मुंबईतल्या ‘या’ १८७ कामांचा शुमारंभ होणार मुंबईचा कायापालट मिशन मोडवर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईच्या वैभवात भर घालेल अशा प्रकारे सौंदर्यीकरणाचे काम हाती घेऊन दृष्यस्वरुपात मुंबईचा कायापालट करावा. मिशन मोडवर हे काम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरम्यान, उद्या ८ डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई सुशोभीकरणाच्या सुमारे १८७ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. मुंबईत उद्या एकाचवेळी १८७ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेची ग्वाही, इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना केले नमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला.  डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, …

Read More »

मत्स्यव्यवसाय, नौकानयन, डिझेल इंजिन देखभाल अभ्यासक्रमाला प्रवेश हवाय? तर वाचा ही बातमी अंधेरीतील वर्सोवा येथे प्रशिक्षणाची संधी

सन २०२३-२०२४ या वर्षातील १ जानेवारी २०२३ ते ३० जून २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १२९ व्या सत्राच्या प्रशिक्षणास प्रवेश घेण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानवन …

Read More »

एमएमआरडीएची अशी ही बनवाबनवी, RTI मधून उघडः कागदपत्रे वाचायला विसरू नका मेट्रोने वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशन जोडण्याची खोटी माहिती देत रद्द करण्यात आले कुर्ला - वांद्रे रेल्वेचा जोडमार्ग

कुर्ला – वांद्रे रेल्वे मार्गाचे रेखन आणि ई व जी ब्लॉकमधील रेल्वे स्टेशनाचा प्रस्ताव रद्द करत खाजगी विकासकास फायदा करुन देण्यासाठी वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्टेशनला मेट्रो जोडण्याची खोटी माहिती देत शासनाची आणि मुंबईकरांची फसवणूक करणा- या एमएमआरडीए अधिकारी वर्गाची चौकशी करत गुन्हा दाखल करणे आणि रद्द केलेला कुर्ला – …

Read More »

मुंबई शिधावाटप सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश जाधव तर सचिवपदी संतोष शिंदे

१२ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मुंबई शिधावाटप कर्मचारी क्रेडिट को ऑप सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे सर्व ११ च्या ११ उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत एकूण २४ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांपैकी संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश जाधव व सचिवपदी संतोष शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच …

Read More »

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

ठाण्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी “माझे ठाणे” ही भावना मनात ठेवून ठाण्याच्या विकासासाठी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »