Breaking News

मुंबई

समीर वानखेडे यांच्याकडील आर्यन खानसह ६ केसेस एनसीबीने काढून घेतल्या दिल्लीची टीम करणार या हायप्रोफाईल केसचा तपास

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज केस प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान केस प्रकरणासह ६ केसेसे आज काढून घेत या केसेसचा तपास दिल्लीच्या पथकाकडून करण्यात येणार असल्याची माहिती साऊथ-वेस्टर्न रिजनचे डेप्युटी डिजी मुथा अशोक जैन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. हा प्रशासकिय निर्णय असल्याची माहितीही त्यांनी …

Read More »

लस घेतलेल्यांनाही करता येणार एक दिवसाचा लोकल प्रवास राज्य सरकारकडून अखेर रेल्वेला पत्र

मुंबई: प्रतिनिधी शहर आणि उपनगराला जोडणाऱ्या उपनगरीय गाड्यांना फक्त लसीचे डोस घेतलेल्या नागरीकांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास देण्यास मान्यता देण्यात येत होती. मात्र दैंनदिन तिकिट मात्र मिळत नव्हते. त्यावर नागरीकांकडून एक दिवसाच्या प्रवासासाठीही तिकीट द्या अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार अखेर आज राज्य सरकारच्या आपतकालीन विभागाने रेल्वेला पत्र लिहीत …

Read More »

आर्यन खानसह तिघेजण घरी: अन्यथा एनसीबी जामीन रद्दसाठी अर्ज करेल या अटींचे पालन करावे लागणार

मुंबई: प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी मागील २७ दिवस अटकेत असलेल्या आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट या तिघांना आज अखेर कागदपत्रांची पुर्तता पूर्ण करण्यात आल्याने सकाळी आर्थर रोड तुरुंगातून घरी सोडण्यात आले. उच्च न्यायालयाने जामी दिल्यानंतरही गुरूवारी, शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याने दोन रात्री तुरुंगात काढावे लागले. मात्र आज …

Read More »

परमबीर सिंग यांना चंदीगढ येथून अटक करून माझ्यासमोर उभे करा ठाणे सत्र न्यायालयाचे आदेश

ठाणेः प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटीं रूपयांची खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप करून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून देणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांना अटक करून हजर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर.जे.तांबे यांनी आज जारी केले. ठाणे येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी …

Read More »

समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवसांची नोटीस द्याः न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला

मुंबईः प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच असलेल्या के.पी.गोसावी याला आज अटक करण्यात आल्यानंतर बनावट जात प्रमाणपत्र आणि खंडणीप्रकरणी अटकेच्या शक्यतेने समीर वानखेडे यांनी आज उच्च न्यायालयात धाव घेत राज्य सरकारला अटक न करण्याचे आदेश द्यावेत अशी याचिका दाखल केली. त्यावर उच्च न्यायालयाने यासंदर्भात वानखेडे यांना अटक करण्यापूर्वी तीन दिवसांची …

Read More »

क्रांती रेडकरांचे मुख्यमंत्री ठाकरे यांना खुले पत्र, मराठीची घातली साद… शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे वाढले

मुंबईः प्रतिनिधी दिवसेंदिवस एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या कार्य पध्दतीबाबत आणि त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडून रोज नवे गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर पती समीरच्या बचावासाठी क्रांती रेडकर यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना खुले पत्र लिहीत न्याय देण्याची मागणी केली. लहानपणापासून मराठी माणसाच्या …

Read More »

आर्यनसह तिघांना अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूरः पण सुटका उद्या अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हे ही बाहेर येणार

मुंबईः प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज प्रकरणी अखेर आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या संपूर्ण निकालपत्र तयार झाल्यानंतर या तिघांना तुरुंगातून सोडण्यात येणार असून शक्य झाल्यास आज रात्रीच किंवा उद्या दिवसभरात या तिघांना सोडण्यात येईल असे सांगण्यात येईल. यासंदर्भात आर्यन खान याचे वकील मुकूल …

Read More »

कोणताही त्रास आणि अडथळ्याविना प्रवास करणे मुंबईत शक्य होणार सार्वजनिक वाहतूक नीटनेटकी, दर्जेदार असणे चांगल्या परिवहन व्यवस्थेचा कणा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई: प्रतिनिधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ, नीटनेटकी व उत्तम दर्जाची असेल तर लोकांचा त्यावरच विश्वास वाढून चांगली परिवहन व्यवस्था आकारास येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. वाढत्या लोकसंख्येचा अभ्यास करून भविष्यातील मुंबई महानगराचा वाहतूक आराखडा तयार करतांना सार्वजनिक वाहतूकीचे स्थान मोठे आहे असेही ते म्हणाले. एमएमआरडीएच्या सर्वंकष …

Read More »

आता सरकारी आणि आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही दोन लसमात्रा बंधनकारक अन्यथा प्रवासाला मज्जाव- राज्य सरकारकडून नवे अध्यादेश

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागात कार्यरत कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांना आता दोन लसींची मात्रा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर या कर्मचाऱ्यांनी दोन लस मात्रा आणि १४ दिवासांचा कालावधी पूर्ण केला नसेल तर आता अशा कर्मचाऱ्यांना रेल्वे लोकल प्रवासासह अन्य …

Read More »

शाळा आणि महाविद्यालयांना दिवाळीची २० दिवस सुट्टी शिक्षण विभागाकडून आदेश जारी

मुंबईः प्रतिनिधी मागील जवळपास वर्ष-दिडवर्षापासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये आता कुठे सुरु होत असताना नेमका दिवाळीचा सण आल्याने दिवाळीची सुट्टी किती दिवस द्यायची यावरून शिक्षण विभाग संभ्रमात होते. मात्र आज अखेर मुंबईतील शिक्षण विभागाने एक पत्रक काढत राज्यातील शाळा आणि १२ वी पर्यंतच्या महाविद्यालयांना २० दिवसांची सुट्टी जाहीर केली. १ …

Read More »