Breaking News

मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंकची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी रस्त्याच्या कामाचा घेतला आढावा

पुणे : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री …

Read More »

उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवा मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाकडून आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. सन २०२० च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या २५ डिसेंबर २०२० पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार …

Read More »

न्यायालयाच्या कंगनाला कानपिचक्या, राऊतांचे म्हणणे अमान्य करत बीएमसीची नोटीस अवैध मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयात धाव घेतलेल्या कंगना राणावत हीला मुंबई उच्च न्यायालयाने चांगल्याच कानपिचक्या देत स्वतःच्या वक्तव्यांना आवर घालण्याचे निर्देश दिले. मात्र कंगनाच्या घरावर महापालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत तिला बजाविण्यात आलेली नोटीस अवैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. शिवसेना प्रवक्ते …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा दावा

मुंबईः प्रतिनिधी कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक-शेतमजुर यांनी संप केला. राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग , वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, …

Read More »

खुशखबर : मनोरीच्या प्रकल्पातून समुद्राचे गोड पाणी मुंबईकरांना मिळणार प्रकल्पाचे पुढील काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मे व जून महिन्यातील पाणी कपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.वर्षा या शासकीय निवासस्थानी २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी …

Read More »

मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांना ठाकरे सरकार देणार घरे त्वरित स्थलांतर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य …

Read More »

ठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला आदेश

मुंबई: प्रतिनिधी ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एमएमआरडीएला दिले. यामध्ये पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर पासून …

Read More »

दिवाळीला मुंबईत फटाके-आतशबाजीवर बंदी पण या दिवशी या गोष्टी वाजविण्यास परवानगी कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे सजगतेने व सतर्क राहून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी प्रकाशाचा आणि आनंदाचा सण अशी ओळख असणारी ‘दीपावली आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर साजऱ्या होणाऱ्या यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाद्वारे सातत्याने व अहोरात्र पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वस्तरीय प्रयत्नांमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या ‘कोविड नियंत्रणात येत …

Read More »

बिल्डरांच्या नोंदणीची अट गृहनिर्माणने काढून टाकली मात्र या गोष्टी केल्या बंधनकारक राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

मुंबई : विशेष प्रतिनिधी शहरातील जून्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नविकासासाठी काही दिवसांपूर्वी म्हाडाकडे बिल्डरांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र त्यास बिल्डरलॉबीकडून विरोध होवू लागताच ही अट रद्द करत सदर इमारतीचा पुर्नविकास ३ वर्षात पूर्ण करणे बंधनकारक करण्याचा निर्णय कायम ठेवत नवी नियमावली गृहनिर्माण विभागाने आज एका आदेशान्वये …

Read More »

मुंबईतल्या फेरीवाल्यांचे पुन्हा सर्वेक्षण करणार मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, …

Read More »