Breaking News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा दावा

मुंबईः प्रतिनिधी
कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक-शेतमजुर यांनी संप केला.
राज्यात मंत्रालयासह सर्व जिल्हयातील सरकारी कार्यालये आणि शाळा बंद होत्या. शासकीय मुद्रणालये, मोटार परिवहन विभाग , वस्तु व सेवा कर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालये, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभाग, तंत्र शिक्षण विभाग, कामगार आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुक्त कार्यालय, विमा संचालनालय, अधिदान व लेखा कार्यालय, आरोग्य भवन , विज्ञान संस्था, कला संचनालय , मत्स्य विभाग, सार्वजनिक पाटबंधारे व बांधकाम विभाग , शासकीय दुग्धशाळा, शासकीय महाविद्यालये , विविध शासकीय संचालनालयातील कर्मचारी या संपात संपूर्णतः सहभागी झाल्याची माहिती बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी दिली. या संपाची तीव्रता आणि कर्मचाऱ्यांचा असंतोष लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने संघटनेला चर्चेला बोलवावे असेही अविनाश दौंड यांनी सांगितले. दिवसीय संप पुढील मोठया लढयाची सुरवात असून सरकारने त्याची योग्यती दखल घ्यावी संघटना अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *